बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान (Aamir Khan) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आमिर आणि किरण राव (Kiran Rao) २०२१ मध्ये वेगळे झाले. दोघांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. लग्नाच्या १६ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतरही दोघांमध्येही मैत्रीचं नातं दिसते. किरणने तिचा मुलगा आझादसोबत आयरा खानच्या लग्नाला हजेरी लावली होती, तर आमिरने किरणला लापता लेडीज या चित्रपटात खूप मदत केली होती. आता आमिरने त्याच्या घटस्फोटानंतर किरणसोबत असलेल्या नात्यावर मौन सोडले.
आमिर खानने एका मुलाखतीत किरण रावबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की, घटस्फोटामुळे ते पती-पत्नीच्या विचारसरणीपासून आणि जबाबदाऱ्यांपासून दूर गेले आहेत. मात्र याचा त्यांच्या भागीदारीवर परिणाम झाला नाही. घटस्फोटाचा आमच्या नातेसंबंधावर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही सांगितले.
किरणसोबतच्या घटस्फोटावर आमिर म्हणाला...हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी केलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला की, घटस्फोटामुळे आमच्या नातेसंबंधावर परिणाम झाला नाही. मग ते व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक. मला वाटते की आम्हाला असे वाटले की आम्ही वेगळे नैसर्गिकरित्या झालो. घटस्फोट हा एक शब्द आहे ज्याचा अर्थ आहे तुम्ही सोडत आहात, तुम्ही दूर जात आहात. आम्ही पती-पत्नी म्हणून वेगळे होत होतो, पण माणूस म्हणून वेगळे होत नव्हतो. त्यामुळे मला असे वाटत नाही की यामुळे काही अडचण निर्माण झाली आहे.
घटस्फोट हा वेगळा विषय आहे - आमिरघटस्फोटानंतरही आमिरसोबत काम करण्याबाबत बोलताना किरणने सांगितले की, त्याच्यासोबत काम करणे खूप छान होते आणि त्याला पॉवर हाऊस म्हटले. आमिर पुढे म्हणाला की, गोष्ट अशी आहे की घटस्फोट हा वेगळा विषय आहे. क्रिएटिव्ह लोक म्हणून, आम्ही खूप चांगले वागतो आणि आम्हाला एकमेकांची मने आवडतात आणि आम्ही एकमेकांच्या मनावर विश्वास ठेवतो. मला असे वाटते की म्हणूनच आम्ही इतके चांगले काम करतो, आमच्या संवेदना समान आहेत. किरणने सांगितले की, जेव्हा त्यांच्यात मतभेद होतात तेव्हा ते बसून गोष्टी सोडवतात. आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो. मला वाटते की भागीदारी इतके दिवस टिकण्याचे हे एक कारण आहे."
लग्नाच्या १६ वर्षानंतर आमिर आणि किरण झाले विभक्तआमिर खान आणि किरण राव यांचे २००५ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आझाद देखील आहे. लग्नाच्या १६ वर्षानंतर आमिर आणि किरणने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली होती.