Join us

​एका नियमामुळे वादात सापडलायं आमिर खान! जाणून घ्या वादाचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 7:29 AM

बॉलिवूडचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ आमिर खान एका स्पर्धेच्या नियमामुळे वादात सापडला आहे. होय, ‘सिनेस्तान इंडियाज स्टोरीटेलर्स’ स्पर्धेसाठी आखला गेलेला एक ...

बॉलिवूडचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ आमिर खान एका स्पर्धेच्या नियमामुळे वादात सापडला आहे. होय, ‘सिनेस्तान इंडियाज स्टोरीटेलर्स’ स्पर्धेसाठी आखला गेलेला एक नियम भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप केला जात आहे आणि यामुळे आमिर वादात गोवला गेला आहे. आता आमिरचा या स्पर्धेशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. होय,आमिर खान या स्पर्धेच्या निर्णायक मंडळाचा सदस्य आहे. हिंदी बुद्धीजीवींनी यानिमित्ताने आमिरला लक्ष्य केले आहे. आमिरने जाणीवपूर्वक हिंदीचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केवळ इतकेच नाही तर यासाठी आमिरसह या स्पर्धेच्या निर्णायक मंडळातील सदस्यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी पुढे रेटली आहे.आता हे सगळे प्रकरण काय, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. तर प्रकरण आहे सिनेस्तान इंडियाज स्टोरीटेलर्स स्पर्धेचे. सिनेस्तान नामक वेब पोर्टलने ‘सिनेस्तान इंडियाज स्टोरी टेलर्स’नावाची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पटकथा लिहिणाºयास गौरविले जाणार आहे. पण या स्पर्धेसाठीचे नियमच वादात सापडले आहेत. होय, पटकथा पाठवणाºया स्पर्धकांसाठी १६ नियम बनवण्यात आले आहेत. यातील शेवटच्या नियमावर हिंदीप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. पटकथा रोमन लिपीतचं असायला हवी. देवनागरीत लिहिलेली पटकथा स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही, असा हा १६ वा नियम आहे.  डॉ. करूणाशंकर उपाध्याय यांनी या नियमावर नेमके बोट ठेवले आहे. बॉलिवूड अभिनेत्यांना हिंदी चित्रपटांनी ओळख मिळते. हे लोक हिंदीची ‘भाकर’ खातात. पण हिंदी रोमनमध्ये लिहून तिचा अपमान करतात. भारतीय राज्यघटनेने संघीय प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा हिंदी आणि लिपी देवनागरी मानली आहे. मग हिंदीला रोमनमध्ये लिहिण्यास कसे बाध्य केले जाऊ शकते. हिंदीचा अपमान करणाºया अशा लोकांवर बहिष्कार घातला जायला हवा, असे उपाध्याय यांनी म्हटले आहे. आमिरने या संपूर्ण प्रकरणावर खुलासा करावा. अन्यथा हिंदी भाषिकांनी आमिरच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहनही त्यांनी केली. या स्पर्धेच्या निर्णायक मंडळात आमिर खान, राजू हिराणी, जुही चतुर्वेदी आणि अंजुम राजाबाली यांचा समावेश आहे.ALSO READ :  ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखला इंडस्ट्रीत कुणी देईना काम ! कारण ठरतोय, आमिर खान!!