Join us

आमिर खानची लेक इरा खानचे बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप? अशी आहे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 1:04 PM

ब्रेक की ब्रेकअप?

ठळक मुद्देइरा आमिर खानसारख्या सुपरस्टार्सची मुलगी आहे. परंतु अशातही ती लो-प्रोफाइल राहून काम करणे पसंत करते.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची लाडकी लेक इरा खान सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. मध्यंतरी इराच्या लव्ह रिलेशनशिपची भलतीच चर्चा रंगली होती.  स्वत: इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर इरा व मिशाल यांचे एक ना अनेक रोमँटिक डान्स व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता इरा व मिशाल यांच्यात बिनसल्याचे कळतेय.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, इरा व मिशाल यांच्या नात्यात दुरावा आला आहे. सूत्रांचे मानाल तर  मतभेद इतके वाढले आहेत की, दोघांनी एकमेकांना भेटणे सोडले आहे. इराने आपल्या करिअरवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून या मतभेदांना सुरूवात झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे तूर्तास या जोडीने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. सध्या इरा तिच्या करिअरवर फोकस करतेय तर मिशालही आपल्या म्युझिक करिअरकडे लक्ष देतोय.

काही दिवसांपूर्वी इराने बॉयफ्रेन्ड मिशालसोबतचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला होता. यात व्हिडीओत दोघेही कपल डान्स करताना दिसले होते.  ‘मला फक्त तुझ्यासोबत डान्स करायचा आहे’, असे हा व्हिडीओ शेअर करताना इराने लिहिले होते.इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता.

इरा आमिर खानसारख्या सुपरस्टार्सची मुलगी आहे. परंतु अशातही ती लो-प्रोफाइल राहून काम करणे पसंत करते. तिला तिच्या टीमबरोबर अतिशय सहजपणे रहायला आणि त्यांच्यात मिसळायला आवडते. स्वत:ला ‘स्टार डॉटर’ म्हणवून घेणे पसंत नाही. ती टीममधील अन्य सदस्यांप्रमाणेच मेहनत करण्यावर भर देते.

टॅग्स :इरा खानआमिर खान