बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लेक इरा खान ( Ira Khan) सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी अतरंगी फोटो तर कधी बॉयफ्रेन्डसोबतचे रोमॅन्टिक व्हिडीओ. तर आता याच इराबद्दल एक गुडन्यूज आहे. होय, आमिरची लेक आता सिंगल नसून मिंगल होण्याच्या तयारीत आहे. इरा बॉयफ्रेन्ड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) एन्गेज्ड झाली आहे. होय, नुपूरने रोमॅन्टिक अंदाजात इराला प्रपोज केलं आणि इराने होकार देताच तिच्या हातात अंगठी घातली.
नुपूरने आपल्या स्वीटहार्टला आयर्न मॅन इटली शोदरम्यान प्रपोज केलं. याचा व्हिडीओ इराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नुपूर रेस कॉस्च्युममध्ये इराजवळ येतो. आधी तो इराला किस करतो आणि मग गुडघ्यावर बसून रिंग काढत तिला प्रपोज करतो. नुपूर हे रोमॅन्टिक प्रपोजल बघून कमालीची उत्सुक होते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती लगेच नुपूरला होकार देते आणि मग नुपूर तिच्या बोटात अंगठी घालतो. यानंतर कपल रोमॅन्टिक होताना दिसतं. इरा नुपूरला किस करते.
इरा व नुपूरचा हा रोमॅन्टिक प्रपोजल व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी इराला शुभेच्छा दिल्या आहे. फातिमा सना शेख, टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ, हुमा कुरेशी, रिया चक्रवर्ती, सारा तेंडूलकर, हेजल किच आदींनी इरा व नुपूरला शुभेच्छा दिल्या आहेत.
इरा व नुपूर 2020 पासून नात्यात आहेत. कपलने आपलं नातं कधीच जगपासून लपवलं नाही. दोघंही अनेकदा खुल्लमखुल्ला फिरताना, एकमेकांसोबत रोमॅन्टिक होताना दिसले. नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर हा खूप चांगला डान्सर देखील आहे. त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्याचे डान्सचे फोटो पाहायला मिळतात. इरा ही आमिर व त्याची पहिली पत्नी रिना दत्तची मुलगी आहे. इराने थिएटर डायरेक्टर म्हणून डेब्यू केला होता. सध्या तरी बॉलिवूडमध्ये येण्याचा तिचा कोणताही इरादा नाही.