Join us

आमिर खानची लेक इराने शेअर केला बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबतचा फोटो, म्हणाली, फायनली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 13:07 IST

इरा आणि नूपूर हे गेल्या सहा महिन्यांपासून डेट करतायेत.

आमिर खानची मुलगी इरा खानने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर चुलत बहीण झेन मॅरीच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.  या फोटोंमध्ये तिच्यासोबत आमिर खानचा कोच  नुपूर शिखरही दिसतो आहे. इरा आणि नुपूर बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करतायेत.  त्याचवेळी झेननेसुद्धा काही फोटो  आपल्या अकाऊंटवरुन शेअर केले आहेत, या फोटोमध्ये इम्रान खान देखील दिसतो आहे.

नुपूर शिखारने वेधलं लोकांचं लक्ष्य इराने फोटो शेअर करताना लिहिले, या सुंदर लोकांसाठी आणि त्यांच्या सुंदर नात्याबद्दल मला फक्त ऐवढंच म्हणायचे आहे ... फायनली. या फोटोंमध्ये आमिरचा फिटनेस कोच नुपूर शिखरसुद्धा आहे. रिपोर्ट्सनुसार, इरा आणि नूपूर हे गेल्या सहा महिन्यांपासून डेट करतायेत. लॉकडाऊन दरम्यान दोघे जवळ आल्याच्या बातम्या आल्या आहेत. इरा आणि नुपूर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात.

इरा खानदेखील काही महिन्यांपूर्वी प्रेमात पडली आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. ती वडिलांच्याच फिटनेस कोच नुपूर शिखरला डेट करत आहे. नुपूर शिखर हा सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. सध्या तो आमिर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतोय. नुपूरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना अप्रत्यक्षणे दोघांच्या प्रेमाची कबुली दिली होती.

टॅग्स :इरा खानआमिर खान