Join us

एक्स वाइफ पत्नी किरण रावच्या चित्रपटासाठी आमिरने दिले ऑडिशन, झाला रिजेक्ट; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 2:52 PM

आमिर खानने किरण रावच्या आगामी सिनेमासाठी ऑडिशन दिलं होते मात्र त्याला रिजेक्ट करण्यात आलं आहे.

किरण राव (Kiran Rao)सध्या तिच्या एका अनटाइटेड चित्रपटात व्यस्त आहे. आमिर खान (Aamir Khan)प्रमाणेच किरणही तिच्या कामात अतिशय परफेक्ट मानली जाते. आपल्या कामाबाबत ती खूपच फोकस असते यात ती  नातीही मध्ये येऊ देत नाही. याचा खुलासा खुद्द आमिरने केला आहे. जेव्हा कामाचा प्रश्न येतो तेव्हा किरण तिचा एक्स पती आमिरलाही सोडत नाही. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटल्या जाणाऱ्या सुपरस्टार्सनेही त्याच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिले असून तो रिजेक्ट झाला आहे.

करिणने केलं आमिरला रिजेक्ट होय, तुमचा विश्वास बसणार नाही, आम्ही तुम्हाला सांगतो की, खुद्द आमिरने आज तकशी संवाद साधत ही गोष्ट सांगितली आहे. किरणच्या आगामी प्रोजेक्टचा खुलासा करताना आमिर म्हणतो, किरण मिसिंग लेडीज टायटलवर चित्रपट तायर करते आहे. यासाठी मी ऑडिशनही दिलं होतं. स्क्रीन टेस्टमध्ये मला किरण रावने रिजेक्ट केलं. तिने कोणतीही तडजोड केली नाही. आता एक अभिनेता म्हणून वाईट वाटते पण तो आपल्या कामाचा एक भाग आहे. मात्र, या भूमिकेसाठी तिला कोणी मिळालं नाही, तर ती मला घेईल, असा दिलासाही किरणने दिला. मला बॅकअपवर ठेवले होते.

आमिर पुढे म्हणतो, “रिजेक्शनमुळे मी उदास झालो होतो. मग मी विचार करतो की माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे. मला आठवतंय मी काही वर्षांपूर्वी हिंदी थिएटरच्या ऑडिशनला गेलो होतो तेव्हा मला नाकारण्यात आलं होतं. खूप वाईट वाटलं, नोटीस बोर्डवर गुजराती थिएटरसाठी ऑडिशन सुरू असल्याचं दिसलं. कोरसमध्ये 30 ते 40 जण हवे होते. म्हणून मी विचार केला की काही होणार नाही तर मी कोरससाठी जाईन. मी लवकर हार मानत नाही. एक दरवाजा बंद झाला की मी लगेच दुसऱ्याकडे वळतो.

काय म्हणाला आमिर खान?आमिर खानचा सोशल मीडियावर अनेकजण या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. तसेच, #BoycottLaalSinghCaddha हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. आमिर खानचा ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपट मोठा फ्लॉप झाला होता. त्यामुळे आमिरला लाल सिंह चड्ढापासून खूप अपेक्षा आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून बॉयकॉट लाल सिंह चड्ढा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या बहिष्कारामुळे आमिर नाराज आहे. यावर आपले मत मांडताना आमिर म्हणाला की, 'चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. केवळ अभिनेताच नाही तर अनेक लोकांच्या भावना चित्रपटाशी जोडल्या जातात. चित्रपट पाहिल्यानंतर, तुम्हाला तो आवडू शकतो आणि तुम्हाला तो नापसंत करण्याचा पूर्ण अधिकार आहे.'

टॅग्स :आमिर खानकिरण राव