Join us  

'लगान'मधील आमिर खानची गोरी मेम ५२ वयातही दिसते कमालीची सुंदर, बघा आता कशी दिसते ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 1:04 PM

Rachel Shelley from lagaan : 'लगान' सिनेमात जिने आमिरला आणि त्याच्या टिमला क्रिकेट मॅच जिंकण्यास मदत केली होती. तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. तुम्हाला माहीत आहे का की, आज ती २० वर्षानंतर कशी दिसते?

२००१ साली 'लगान' (Lagaan) सिनेमा आला होता. या सिनेमातील आमिर खानची भूमिका आजही त्याच्या करिअरमधील सर्वात चांगल्या भूमिकांपैकी एक आहे. या सिनेमात त्याने जीव ओतून काम केलं होतं. तसेच यातील आमिरची गोरी मेम (Rachel Shelley), जिने आमिरला आणि त्याच्या टिमला क्रिकेट मॅच जिंकण्यास मदत केली होती. तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. तुम्हाला माहीत आहे का की, आज ती २० वर्षानंतर कशी दिसते?

'लगान' सिनेमातील सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केलं होतं. म्हणूनच तर सिनेमा ऑस्करपर्यंत गेला होता. आजही प्रेक्षकांच्या मनात या सिनेमासाठी वेगळी जागा आहे. तसेच सिनेमात अनेक भूमिकाही फेवरेट आहेत. यातील एक भूमिका इंग्रज तरूणीची भूमिका होती. एलिजाबेथ रसेल असं या भूमिकेचं नाव होतं आणि ही भूमिका साकारली होती रशेल शॅले या अभिनेत्रीने.

ही अभिनेत्री नंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा दिसली नाही. आता ती कशी दिसत असेल हेही अनेकांना माहीत नाही. अशात तिचे लेटेस्ट काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून आजही ती सिनेमात दिसत होती तशीच दिसत आहे. 

रशेलचे हे फोटो इन्स्टाग्रामवर तिच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंच्या कमेंट बॉक्समध्ये तिचे फॅन्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकजण हेच म्हणाले की, तिच्या वयाचा अंदाज लावणं सोपं नाही. तर काही लोकांनी तिच्या 'लगान'मधील कामाचं कौतुक केलं आहे. तसेच काही लोक म्हणाले की, त्यांना तिला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात बघायला आवडेल.

सोशल मीडियापासून दूर राहते रशेल

रशेलचं ऑफिशिअल इंन्स्टाग्राम पेज नाहीये. अशात अंदाज लावला जाऊ शकतो की, ती सोशल मीडियापासून दूर राहते. पण तिचं फॅन पेज आहे. ज्यावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर केले जातात. यातील अनेक फोटो लगान सिनेमावेळचे आहेत. दरम्यान रशेल एक मॉडल आणि रायटर आहे. ती 'द एल वर्ड' सीरिजमध्ये हेलेना पीबॉडीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. 

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडइंटरेस्टींग फॅक्ट्ससेलिब्रिटी