‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी आमिर खानने तयार केली खास ‘प्रमोशनल स्ट्रॅटेजी’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 10:37 AM2018-05-29T10:37:49+5:302018-05-29T16:07:49+5:30
यंदाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे मेकर्स सध्या प्रमोशनल स्ट्रॅटेजीवर काम करत आहेत. आमिर खान आणि ‘ठग्स आॅफ ...
य दाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे मेकर्स सध्या प्रमोशनल स्ट्रॅटेजीवर काम करत आहेत. आमिर खान आणि ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा निर्माता आदित्य चोप्रा यांनी यासाठी एक काही खास योजना तयार केली आहे. ताज्या माहितीनुसार, चित्रपटांच्या गाण्यांचा प्रमोशनसाठी खास वापर केला जाणार आहे. आधी या चित्रपटाला शंकर-एहसान-लॉय संगीत देणार होते. पण नंतर त्यांनी या प्रोजेक्टमधून ऐनवेळी हात काढून घेतले. यानंतर अजय व अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले. अलीकडे टीमने चित्रपटाचे संगीत ऐकले तेव्हा त्यांना ते कमालीचे आवडले आणि याचवेळी ही प्रमोशन स्ट्रॅटेजी ठरली. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या बातमीनुसार, आमिर खान व आदित्य चोप्रा यांनी दोघांनी सुरूवातीला प्रमोशनदरम्यान गाण्यांचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या स्क्रिप्टमध्ये झालेल्या बदलामुळे शंकर-एहसान-लॉय यांनी या प्रोजेक्टमधून अंग काढून घेतले होते. काहींच्या मते, शंकर-एहसान-लॉय यांच्या हातात कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’ हा चित्रपटही होता. त्यांना एकाचवेळी दोन मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचे नव्हते. त्यांनीच या चित्रपटासाठी आमिरला अजय - अतुलचे नाव सुचवले होते, असेही कळते. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या अॅडव्हेंचर-अॅक्शन ड्रामामध्ये अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यंदा दिवाळीला रिलीज होणार असून यशराज बॅनरचा हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. सुमारे २०० करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात समुद्री जहाजांवर काही अॅडव्हेंचर-अॅक्शन दृश्य चित्रीत केले जात आहेत.
ALSO READ : 'या' चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आमिर खानने कसली कंबर, सप्टेबरपासून लागणार प्रमोशनच्या कामाला
हा चित्रपट १९३९ साली आलेल्या ‘कन्फेशन्स आॅफ ए ठग’ या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. आमिर खान यात मुख्य भूमिकेत आहे. संबंधित कादंबरीत आमिर अली नावाचा एक ठग असतो आणि तो इंग्रजांच्या नाकीनऊ आणतो. तो एक पठाण आहे. इस्माईल नावाचा एक मोठा ठग त्याला जवळ करतो आणि मुलासारखे वाढवतो. आमिर अली त्याचे मित्र बद्रीनाथ आणि पीर खानसोबत ठगबाजी सुरू करतो. यात गणेशा आणि चीता त्याची मदत करतात. नंतर आमिर अली मोठा जमीनदार बनतो, असे याचे कथानक आहे. कादंबरीतील आमिर अलीचे हेच पात्र आमिर साकारतो आहे.