Join us  

आमिर खान करणार कंगान राणौतला एवरेस्ट सर करायला मदत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 5:42 AM

बॉलिवूड क्वीन कंगना राणौत  'मर्णिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' मध्ये झांसीची राणी झाल्यानंतर माऊंट एवरेस्ट सर करायला घेणार आहे. ...

बॉलिवूड क्वीन कंगना राणौत  'मर्णिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' मध्ये झांसीची राणी झाल्यानंतर माऊंट एवरेस्ट सर करायला घेणार आहे. असे गांधळून जाऊ नका कंगना  अपंग महिला अरुणिमा सिन्हा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. अरुणिमा सिन्हा या पहिल्या अपंग महिला होत्या ज्यांनी एवरेस्ट सर केला होता. नुकताच आमिर खान, कंगना राणौत आणि  मर्णिकर्णिकाचे निर्माते कमल जैन यांचा एक फोटोसमोर आला आहे. या फोटोसमोर आल्यानंतर ही भेट चित्रपटासंदर्भात झाली असावी असा अंदाज लावण्यात येतो आहे. अरुणिमा सिन्हा यांच्या बायोपिकची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटासाठी कंगना राणौतने आमिर खानशी हात मिळवणी केली आहे. बॉलिवूडचा क्वीन कंगना आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे एकत्र मिळून चित्रपट तयार करणार तर या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असणारच. ALSO READ :  कंगना राणौत आयटम नंबर्स का करत नाही?जर तुम्ही विचार करत असला की आमिर खान या चित्रपटात कंगनासोबत स्क्रिन शेअर करणार आहे तर जर थांबा. आमिर या चित्रपटात अभिनय नाही तर निर्मिताची जबाबदारी पार पाडणार आहे. यासंदर्भात अजून चर्चा होते आहे. आमिर खान या चित्रपटाला घेऊन साकारत्मक प्रतिसाद देतो आहे अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याआधी ही आमिरसोबत काम करण्याची संधी कंगना मिळाली होती मात्र तिने त्यास नकार दिला. आमिर खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये काम करण्यासाठी कंगनाला विचारणा करण्यात आली होती मात्र कंगनाला अमीर आणि अमिताभ पुढे आपल्यालाला काहीच वजन मिळणार नाही असे तिला वाटले असेल म्हणून तिने हा चित्रपट नाकारल्याची चर्चा होती.  मिळालेल्या माहितीनुसार आता जी भूमिका चित्रपटात कॅटरिना कैफ साकारते आहे त्या भूमिकेसाठी आधी कंगनाची निवड करण्यात आली होती. मात्र अखेर कंगना आणि आमिर आता एकत्र काम करताना दिसणार आहेत.