Join us

आर्थिक संकटात असणाऱ्या नितीन देसाईंना बॉलिवूडमधून कोणीच का मदत केली नाही?, आमिर खान म्हणाला- याविषयी....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 3:34 PM

बॉलिवूडसाठी इतकी वर्ष काम करणाऱ्या नितीन देसाई यांना इंडस्ट्रीतून कोणी मदत का केली नाही, असा प्रश्न आमिरला विचारण्यात आला.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई  त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी एन.डी. स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आशुतोष गोवारिकर, आमिर खान, मधुर भांडारकर, रवी जाधव, सुबोध भावे, मनोज जोशी, मुकेश ऋषी,निखिल साने यांनी अंत्यदर्शन घेतले. नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देताना सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीदेखील भावूक झाले. 

आपल्या लाडक्या कलादिग्दशर्काला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र इतकी वर्ष हिंदीत काम करुनही काही मोजकेच हिंदीतले चेहरे देसाईंना निरोप देण्यासाठी एन.डी. स्टुडिओमध्ये आले होते. त्यामुळे बॉलिवूड नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलं आहेत. लगान चित्रपटात त्यांच्या सोबत काम केलेल्या आमिर खानला यावेळी पत्रकारांनी घेरलं होतं.

आमिरला अनेक प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारलं यापैकी एक प्रश्न असा होता की, नितीन देसाई यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतून कोणी मदत का केली नाही. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना आमिरने आधी नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी शोक व्यक्त केला.  आम्ही जो जिता ओ सिकंदरपासून एकत्र काम करतोय. मला वैयक्तिक खूप दुःख झालंय असं घडलंय काही घडलंय यावर अजून माझा विश्वास बसत नाही. नितीनजींनी खूप कमाल काम केलंय.. खूप हुशार आणि क्रिएटिव्हिटी होते ते. मी शेवटचं त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या आधी भेटलो होतो. ते मुलीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला मला आले होते. तेव्हा आम्ही दीड-दोन तास बोलला होता. त्यावेळी ती खूप खुश दिसत होते.  

बॉलिवूडमधून नितीन देसाईंची कोणी मदत का केली नाही, या प्रश्नाच उत्तर देताना आमिर , ''याविषयी कोणालाच काही माहीत नव्हतं.” देसाई यांच्या अंत्यविधीला इंडस्ट्रीतून फार कमी कलाकार उपस्थित होते, असं म्हटल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना आमिर म्हणाला, ''बॉलिवूड मधील काही लोक येऊ शकली नाहीत त्यामागे त्यांची काही वेगळी कारण असतील. पण मला खात्री आहे की प्रत्येक कलाकाराच्या मनात त्यांचं एक खास स्थान आहे.''

नितीन देसाई यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. या कर्जाच्या वसुलीसाठी ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी यांनी सारखा तगादा लावला होता. तसेच मानसिक त्रास दिला होता. त्या मानसिक त्रासाला कंटाळून देसाई यांनी आत्महत्या केली आहे, अशी तक्रार नेहा देसाई यांनी दिली होती. 

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईआमिर खान