Join us

​आमिर खानने दिला अंतराळवीर बनण्यास नकार! वाचा, या नकारामागचे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 7:35 AM

आमिर खान आपल्या चित्रपटांची निवड अतिशय काळजीपूर्वक करतो. सहसा आमिरचा निर्णय चुकत नाही. पण यावेळी आमिरचा अंदाज चुकलाय. होय, ...

आमिर खान आपल्या चित्रपटांची निवड अतिशय काळजीपूर्वक करतो. सहसा आमिरचा निर्णय चुकत नाही. पण यावेळी आमिरचा अंदाज चुकलाय. होय, कदाचित त्यामुळेच अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर आधारित ‘सॅल्यूट’ या बायोपिकमधून आमिर बाहेर पडल्याची खबर आहे. हा चित्रपट महेश मथाई दिग्दर्शित करणार आहेत तर स्वत: आमिर आणि सिद्धार्थ राय कपूर हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. ‘सॅल्यूट’मध्ये आमिर असणार,अशी चर्चा होती. पण आता असे नसणार आहे. होय, आमिरने स्वत:ला या प्रोजेक्टमधून वेगळे केल्याचे कळतेय. याचे कारण म्हणजे, येणारे एक दशक आमिर स्वत:ला एका खास प्रोजेक्टमध्ये वाहून घेणार आहे. हा खास प्रोजेक्ट कुठला तर होम प्रॉडक्शनच्या चित्रपटांचा. सूत्रांचे खरे मानाल तर, येती काही वर्षे आमिर केवळ त्याच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटांना देणार आहे.आमिरने ‘सॅल्यूट’मधून काढता पाय घेतल्यानंतर मेकर्सनी या चित्रपटासाठी शाहरूख खानला संपर्क केल्याचे कळते. या चित्रपटात आमिरच्या अपोझिट प्रियांका चोप्रा काम करणार होती, अशीही खबर होती. अंतराळवीर राकेश शर्माच्या पत्नीची भूमिका प्रियांका साकारणार असल्याचे म्हटले जात होते. आता आमिर नाही म्हटल्यानंतर कदाचित प्रियांका शाहरूखच्या अपोझिट दिसू शकते. अर्थात अद्याप याबद्दल काहीही फायनल नाही. पण शाहरूखने यासाठी होकार दिलाच आणि प्रियांका या चित्रपटात दिसणार, ही बातमी खरी असेल तर प्रेक्षकांना नववर्षाची ट्रिट मिळालीच म्हणून समजा.ALSO READ : आमिर खानला पत्नीने तब्बल तीन आठवडे रूममध्ये केले होते बंद, वाचा सविस्तर!राकेश शर्मा यांनी २ एप्रिल १९८४ साली सोयुझ टी-११ या यानातून अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणून मान मिळविला होता. ३५ व्या राष्टÑीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी असणारे राकेश शर्मा हे भारतीय वायूदलात टेस्ट पायलट म्हणून १९७० साली सहभागी झाले. दरम्यान त्यांनी विमान चालविण्याचे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर १९८४ साली स्क्वॅड्रन लीडर आणि पायलट म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९८२ साली इस्त्रो आणि सोव्हिएट इंटरकॉसमॉस यांच्या संयुक्त अभियानासाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर अंतराळात जाणारे ते पहिले भारतीय ठरले. ७ दिवस २१ तास आणि ४० मिनिटे इतका वेळ त्यांनी अंतराळात घालविला.