गेल्या काही काळात बॉलिवूडमध्ये कलाकारांपेक्षा त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्स सातत्याने चर्चेत येत आहेत. विशेष म्हणजे हे स्टारकिड्स त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस जीवनशैलीमुळे सातत्याने चर्चेत येत असतात. परंतु, या सगळ्यामध्ये अभिनेता आमिर खान (aamir khan) याचा लेक वेगळा ठरतो. सुपरस्टारचा मुलगा असूनही जुनैद (junaid khan) आजही अत्यंत सामान्यांप्रमाणे जीवन जगतो. इतकंच नाही तर तो आजही बस आणि ट्रेन यांसारख्या सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतो. त्यामुळे सध्या त्याच्या साधेपणाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
गेल्या काही काळात सुहाना खान (suhana khan), निसा देवगण, सारा अली खान (sara ali khan), वरुण धवन (varun dhawan) आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) यांसारखे स्टारकिड्स सातत्याने चर्चेत येत आहेत. यात खासकरुन हे स्टारकिड्स त्यांच्या राहणीमानामुळेच चर्चेत येतात. मात्र, या सगळ्यांपेक्षा आमिरचा लेक प्रचंड वेगळा आहे. जुनैद आज २ हजार कोटी रुपये संपत्तीचा मालक असूनही अत्यंत साधेपणाने आयुष्य जगत आहे.
एका मुलाखतीमध्ये आमिरने स्वत: जुनैदच्या लाइफस्टाइलविषयी खुलासा केला होता. ''जुनैदकडे एकही कार नसल्याचं त्याने म्हटलं होतं. त्याचं आयुष्य अन्य स्टारकिड्स पेक्षा वेगळं आहे. त्यामुळे तो सर्वसामान्यांसारखं ट्रेन, बस, रिक्षा यांसारख्या वाहनांनी प्रवास करतो. त्याला पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायला आवडतो'', असंही आमिरने सांगितलं.
दरम्यान, जुनैद लवकरच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. 'महाराज' या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात अभिनेत्री शालिनी पांडे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.