आमिर खान-सलमान खान (aamir khan) यांचा गाजलेला 'अंदाज अपना अपना' सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. हो हो, तुम्ही बरोबर वाचताय. 'अंदाज अपना अपना' (andaz apna apna) री-रीलीजची मोठी घोषणा सिनेमाच्या निर्मात्यांनी केलीय. इतकंच नव्हे तर उद्या (१३ फेब्रुवारी) 'अंदाज अपना अपना'चा नव्या अंदाजात टीझर रिलीज होणार आहे. 'अंदाज अपना अपना' कधी रिलीज होणार? याविषयी मेकर्सने मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या सविस्तर.
'अंदाज अपना अपना' होणार री-रीलीज
आमिर खान-सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'अंदाज अपना अपना' सिनेमा एप्रिलमध्ये पुन्हा रिलीज होणार आहे. अमर, प्रेम, राम गोपाल बजाज, क्राईम मास्टर गोगो, तेजा हे 'अंदाज अपना अपना'मधील सर्वच कॅरेक्टर्स चांगलेच गाजले. अशातच 'अंदाज अपना अपना' पुन्हा रिलीज होणार असल्याने ३१ वर्षांपूर्वी थिएटरमध्ये ज्यांना बघता आला नाही, त्या प्रेक्षकांना 'अंदाज अपना अपना' थिएटरमध्ये बघून खळखळून हसण्याची संधी मिळणार आहे. सिनेमाची रिलीज डेट १३ फेब्रुवारीला जाहीर होईल, अशी शक्यता आहे.