बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) सध्या चर्चेत आहे. 'लालसिंग चड्डा' च्या अपयशानंतर आमिरचा एकही सिनेमा आलेला नाही. मात्र त्याने निर्मिती केलेले चित्रपट रिलीज होत आहेत. त्यातलाच एक म्हणजे एक्स वाईफ किरण रावचा 'लापता लेडीज'. आगामी 'सितारे जमीन पर'हा सिनेमाही येणार आहे ज्यात आमिर स्वत: काम करतोय. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने काल इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी लाईव्हमध्येच धुम्रपान केल्याने त्याला चाहत्याने टोकलं. तेव्हा त्याची प्रतिक्रियाही मजेशीर होती.
आमिर खानची स्टाईल नेहमीच हटके असते. आजकाल त्याच्या फॅशन सेन्सलाही खूप ट्रोल केलं जातं. मात्र आमिरचा साधा स्वभाव प्रेक्षकांना भावतो. कालच्या इन्स्टाग्राम लाईव्हमध्येही त्याने चाहत्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. मात्र मध्येच त्याने इलेक्ट्रिक सिगारेट जाळत धुम्रपान करायला सुरुवात केली. यावर एका चाहत्याने कमेंट केली, 'ड्रग्स घेत आहेस का?' यावर आमिरला कमेंट वाचून धक्काच बसला आणि त्याने त्याच्या स्टाईलमध्ये विचारले, 'काय बोलतोय यार?'
याशिवाय आमिरच्या फॅशन सेन्सवर एकाने कमेंट केली की, 'तुला स्टायलिस्ट बदलण्याची गरज आहे.' यावर आमिर म्हणाला, 'मी जे घातलंय ते चांगलं तर दिसत आहे. काय वाईट आहे यात. माझी स्टाईल जरा युनिक आहे त्यामुळे लोकांना फारशी आवडत नाही.'
स्वत:च्या लेकीच्या नाही पण अंबानींच्या लग्नात का नाचलास? चाहत्याच्या प्रश्नावर आमिर म्हणाला...
सध्या आमिरचे निर्माता म्हणून काम सिनेमे सुरु आहेत. यामध्ये किरण रावचा 'लापता लेडीज' जो नुकताच रिलीज झाला आहे. तसंच आमिर मुलगा जुनैद खानलाही 'महाराजा' सिनेमातून लाँच करतोय. शिवाय सनी देओलच्या 'लाहोर 1947' या सिनेमाची निर्मितीही आमिर खान करत आहे.