बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) १४ मार्च रोजी त्याचा ६०वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याने प्री-बर्थडे सेलिब्रेशन सुरू केले असून वाढदिवसाच्या एक दिवस आधी आमिरने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकारांसोबत सेलिब्रेशन केले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. एवढंच नाही तर त्याने सर्व पत्रकारांना चकीत करणारी एक गोष्ट केली. यावेळी त्याने पत्रकारांना त्याची गर्लफ्रेंड गौरीला (Gauri Spratt) भेटवले.
हो, हे खरंय. आमिर खानने त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी पत्रकारांसोबत बर्थडे सेलिब्रेशन केले आणि शेवटी त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला भेटवले. तसेच त्यांच्याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. आमिर आणि गौरी २५ वर्षांपूर्वी भेटले होते आणि आता ते पार्टनर आहेत. ते एकमेकांच्या बाबतीत खूप सीरियस आहेत. दीड वर्षांपासून ते एकत्र आहेत.
गेल्या १८ महिन्यांपासून एकत्र राहताहेत दोघं
आमिर आणि गौरीने मीडियासोबत बातचीत केली. यावेळी त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं. आमिर म्हणाला की, दोघांची भेट २५ वर्षांपूर्वी झाली होती आणि मधल्या काळात आम्ही संपर्कात नव्हतो. मात्र काही वर्षांपूर्वी आम्ही परत एकमेकांच्या संपर्कात आलो. मागील १८ महिन्यांपासून आम्ही एकत्र आहोत. पुढे आमिर म्हणाला की, पाहिलंत, तुम्हाला याचा थांगपत्ता लागू दिला नाही ना मी.
लग्नाबद्दल आमिर म्हणाला...
लग्नाबद्दल विचारले असता आमिर म्हणाला की, सध्या लग्नाचा विचार केला नाही. आम्ही एकत्र आनंदी आहोत. लग्नाचं नंतर बघू. गौरीचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. गौरीला आमिरच्या कुटुंबातील सदस्यांना भेटली आहे आणि ते या नात्यामुळे खूश आहेत. आमिर म्हणाला की, ते या नात्यापासून खूश आहेत. गौरीने आमिरचे दोन सिनेमे पाहिले आहेत. यावेळी गौरी म्हणाली की, आमिरला मी सुपरस्टार मानत नाही. बॉलिवूडमध्ये कंफर्टेबल होत आहे. सलमान आणि शाहरुखला काल भेटले. गौरी अर्धी तमिलीयन आणि अर्धी आयरिश आहे.