Join us

या गंभीर आजारावर आधारीत असणार आमिरच्या 'सितारे जमीन पर'ची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 6:41 PM

आमिर खानच्या आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात आमिर या गंभीर आजारावर आधारीत कथा दिसणार आहे

आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. आमिरचे सिनेमे म्हणजे सुपरहिटची गॅरंटी असं समजतात. परंतु आमिरचा शेवटचा सिनेमा म्हणजे 'लाल सिंग चढ्ढा' फ्लॉप झाल्याने आमिरच्या नवीन सिनेमाकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे. आमिरच्या नवीन सिनेमाचं नाव आहे 'सितारे जमीन पर'. 'सितारे जमीन पर'ची कथा काय असणार, याचा  खुलासा झालाय.

आमिरने 'तारे जमीन पर' मधून डिसलेक्सियाची गंभीर समस्या सर्वांना दाखवली. आता आमिर 'सितारे जमीन पर' मधून डाऊन सिंड्रोमच्या समस्येला स्पर्श करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तारे जमीन पर प्रमाणेच आमिर खानला आणखी एका परिस्थितीवर लक्ष केंद्रित करायचे आहे.   'सितारे जमीन पर' मध्ये डाउन सिंड्रोमवर प्रकाश टाकणारी हृदयस्पर्शी कथा बघायला मिळेल. आमिर अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय मांडणार असून डाऊन सिंड्रोम लोकांना समान वागणुक देण्याचं आवाहन हा सिनेमा करणार आहे.

डाऊन सिंड्रोमबद्दल बोलायचं तर.. या आजारात बाळाची वाढ खुंटते, त्याला अपंगत्व येतं. क्वचित समयी तो दिव्यांगही होतो. या गंभीर आजारावर आधारीत  'सितारे जमीन पर'ची कथा असणार आहे. जिनिलीया देशमुख सिनेमात प्रमुख भूूमिका साकारणार आहे. तर आमिर छोट्या भूमिकेत दिसणार आहे.  'सितारे जमीन पर'चं शूटींग सुरु झालं असून याच वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये सिनेमा भेटीला येईल.

टॅग्स :आमिर खानजेनेलिया डिसूजा