कॅटरिना कैफ सध्या भाईजान सलमान खानच्या ‘भारत’ या आगामी चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाच्या शूटींगमधून जराचा वेळ काढून कॅटरिनाने अलीकडे ‘स्टारी नाईट्स 2’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या चॅट शो दरम्यान कॅटने भरभरून गप्पा मारल्या. इंडस्ट्रीतील अनेक मित्रांबद्दल ती बोलली. केवळ इतकेच नाही तर व्हिडिओ मॅसेजद्वारे कॅटरिनाचा एक खास मित्रही यावेळी दिसला. हा खास मित्र कोण तर आमिर खान.
होय, आमिरसोबत कॅटरिनाने ‘धूम 3’ व ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये काम केले आहे. या व्हिडिओ मॅसेजमध्ये आमिरने एक किस्सा शेअर केला. हा किस्सा कसला तर एका पैजेचा. होय, कॅटरिना व आमिर यांच्यांत पैज लागलीय. त्यानुसार, आमिर व कॅट यांच्यात चेस गेम अर्थात बुद्धिबळाचा सामना होणार आहे आणि कॅट या गेममध्ये हरली तर तिला गॅलेक्सी बाहेर उभे राहून ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए’ हे गाणे गायचे आहे. आता गॅलेक्सीत कोण राहतो हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. भाईजान सलमान खान गॅलेक्सीत राहतो.