बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान नेहमी हटके भूमिका करताना दिसतो. चित्रपटातील भूमिका खास ठरावी यासाठी या अभिनेत्याला एका अवतारातून दुसऱ्या अवतारात शिरताना सगळ्यांनीच पाहिले आहे. त्यासाठी कधी त्याने पगडीबरोबर लांब दाढी धारण केली तर कधी खुल्या केसांबरोबर दाढी, कधी क्रू कट लुक तर कधी आणखी काही. आता आपला आगामी चित्रपट लाल सिंग चढढासाठी देखील तो असेच काहीतरी हटके प्रयोग करताना दिसून येणार आहे.
'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटासाठी लांब दाढी ठेवल्यानंतर आता तो अलिकडेच क्लीन शेव लूकमध्ये दिसून आला. आता तो पंजाबमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. आमीरच्या सरदारच्या लूकबरोबरच त्याच्या लांब दाढीतील लूकचीही प्रशंसा होत आहे.
आता क्लीन शेवसह आमिरचा एक नवा लूक समोर आला आहे. या लूकमुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता अधिकच वाढली आहे.