Join us

आमिर खानने घेतला मोठा निर्णय, 'लाल सिंग चढ्ढा'च्या रिलीजपर्यंत मोबाईल फोन ठेवणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:00 IST

आमिर आणि करीना कपूर खानदेखील 'लाल सिंह चड्ढा' मध्ये एकत्र दिसणार आहेत.

आमिर खानचा सिनेमा 'लालसिंग चड्ढा' लवकरच रिलीज होणार आहे, पण हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच आमिरने एक मोठा निर्णय घेतला आहे. आमिर खान नेहमीच काहीतरी वेगळं करतो आणि यावेळीही त्याने असं केलं आहे. 'लालसिंग चड्ढा' रिलीज होईपर्यंत आपला मोबाईल बंद करण्याचा निर्णय अभिनेत्याने घेतला आहे.

अभिनेत्याने स्वत: ला त्याच्या फोनपासून दूर करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला असे वाटत होते की हे त्याच्या कामात सतत अडथळा आणत आहे. सर्वांना हे माहित आहे की आमिर खान आपल्या भूमिकेशी पूर्णपणे समरस होतो आणि ज्या प्रोजेक्टवर तो काम करतो आहे त्यात पूर्णपणे आत्मसमर्पण करतो. अशा परिस्थितीत 'लालसिंग चड्ढा' दरम्यान त्याचा फोन अडथळा ठरू इच्छित नाही, म्हणून अभिनेत्याने हे पाऊल उचलले आहे.

 

हा सिनेमा या वर्षाच्या मोस्ट अवेडेट सिनेमांपैकी आहे.  आमिर खान स्टारर हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार आहे. आमिर आणि करीना कपूर खानदेखील 'लाल सिंह चड्ढा' मध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहेत. शेवटचे दोघे '3 इडियट्स'  एकत्र दिसले होते. 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट टॉम हँक्सचा फॉरेस्ट गम्पपासून प्रेरीत होऊन बनवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. . 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे

टॅग्स :आमिर खान