Join us

'सितारे जमीन पर'मध्ये आमिर खान करणार २२ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत रोमांस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:22 AM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या चर्चेत आला आहे. त्याने नुकतेच सितारे जमीन पर चित्रपटातून कमबॅक करत असल्याचे सांगितले.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या चर्चेत आला आहे. त्याने नुकतेच सितारे जमीन पर चित्रपटातून कमबॅक करत असल्याचे सांगितले. या चित्रपटात तो २२ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत रोमांस करताना दिसणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे जिनिलिया डिसूझा (Genelia Dsouza-Deshmukh). आमिर खान आणि जिनिलिया पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. आमिर खानने सांगितले की, हा चित्रपट तारे जमीन परसारखा असेल. मात्र त्याच्या १० पावलं पुढे असेल.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राच्या दाव्यानुसार, पूर्ण चर्चा केल्यानंतर जिनिलिया देशमुखला चित्रपटात घेण्यात आले आहे. आमिर खानचे म्हणणे आहे की, जिनिलिया एक स्ट्रॉंग इंडिपेंडेंट महिलेच्या भूमिकेसाठी योग्य आहे. दिग्दर्शकासोबत चर्चा केल्यानंतर आमिर खानने जिनिलियाची मुख्य भूमिकेसाठी निवड केली आहे.

जिनिलिया साकारणार ही भूमिकाजिनिलिया आमिर खानच्या प्रेमिकेची भूमिका साकारणार आहे, असे सूत्रांनी पिंकविलाला सांगितले. विशेष दिव्यांग लोकांच्या टीमला प्रशिक्षित करण्यासाठी ती नायकाच्या बरोबरीने पाऊल टाकेल. ही भूमिका आणि आमिरसोबत काम करण्यासाठी जिनिलियाही खूप उत्सुक आहे. सूत्राने सांगितले की, 'स्क्रिप्ट आणि पात्रांची मागणी लक्षात घेऊन ही एक आदर्श कास्टिंग आहे.'

१५ वर्षांपूर्वी रिलीज झाला होता 'जाने तू या जाने ना'२००८ मध्ये रिलीज झालेल्या 'जाने तू या जाने ना'ची निर्मिती आमिर खानने केली होती. अब्बास टायरवाला यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. यामध्ये  आमिरचा भाचा इमरान खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात जिनिलिया डिसूझाने त्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. प्रतीक बब्बर आणि मंजरी फडणीस हे देखील सहाय्यक भूमिकेत दिसले होते. हा त्या वर्षीचा हिट चित्रपट होता.

आमिर खानने केले आगामी चित्रपटाची घोषणाआमिर खानने न्यूज १८ इंडियाशी संवाद साधताना खुलासा केला होता की तो 'सितारे जमीन पर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. तो म्हणाला होता, 'मी 'सितारे जमीन पर' या चित्रपटात काम करत आहे आणि त्याची निर्मितीही करत आहे. 'तारे जमीन पर' ही थीम घेऊन आम्ही दहा पावले पुढे जात आहोत. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवले, हा चित्रपट तुम्हाला हसवेल. आमिर पुढे म्हणाला होता, 'तारे जमीन पर'मध्ये मी दर्शील सफारीच्या व्यक्तिरेखेला मदत केली होती, पण या चित्रपटात नऊ मुले मला त्यांच्या समस्यांमध्ये मदत करतील.

टॅग्स :आमिर खानजेनेलिया डिसूजा