बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)च्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्याची मुलगी आयरा खान (Ira Khan) तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे(Nupur Shikhare)सोबत लग्नगाठ बांधणार आहे. या जोडप्याने मागील वर्षी इटलीमध्ये एंगेजमेंट केली आणि त्यानंतर मुंबईत एंगेजमेंट पार्टीचे आयोजन केले होते. या सगळ्या दरम्यान आमिरची मुलगी आयरा आणि नुपूरच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.
ई टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, एका जवळच्या व्यक्तीकडून माहिती मिळाली आहे की आयराचे लग्न जानेवारीच्या पहिल्या वीकेंडमध्ये उदयपूरमधील एका आउट डोअर ठिकाणी होणार आहे. याआधी ३ जानेवारीला आयरा आणि नुपूरचे कोर्ट मॅरिज होणार आहे, त्यानंतर लग्नाच्या सर्व विधींना सुरुवात होईल. मात्र, दिल्लीत लग्नाचे रिसेप्शनचे कोणतेही नियोजन नाही, मात्र १३ जानेवारीला मुंबईत इंडस्ट्रीसाठी मोठे वेडिंग रिसेप्शन आयोजित केले जाईल. सध्या आमिर खान आपल्या लेकीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. अलीकडेच तो मुंबईतील एका मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानात आपल्या मुलीसाठी दागिने खरेदी करताना दिसला.
आयराच्या लग्नात कोणकोण राहणार उपस्थितआमिर खानची मुलगी आयरा खानचे लग्न हे तारेवरची कसरत असू शकते. सलमान खान, जुही चावला, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, हृतिक रोशन, शाहरुख खान आणि करीना कपूर खान यांच्यासह अनेक स्टार्स आमिरच्या लाडक्या लेकीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन दरम्यान इरा आणि नुपूर यांची झाली भेट२०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान आयरा आणि नुपूरच्या नात्याची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी आयरा तिच्या वडिलांच्या घरी राहत होती. सुरुवातीला, फिटनेस ट्रेनर असलेल्या नुपूरने फिटनेस सत्रांद्वारे आयराशी संपर्क साधला, परंतु त्यांच्यात मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले आणि आता ते लग्न करणार आहेत.
आमिर खानने भावी जावयाचे कौतुकएका मुलाखतीत आपल्या भावी सुनेचे कौतुक करताना आमिर खानने आव्हानात्मक काळात इराला साथ दिल्याबद्दल नुपूरचे कौतुक केले होते. आमिर म्हणाला होता की, खरे तर नुपूर असा आहे ज्याने आयराच्या पाठीशी उभे राहून तिला भावनिक आधार दिला आहे. मला आनंद झाला की तिने असा एक माणूस निवडला. ते एकत्र खूप आनंदी आहेत, त्यांना खरोखर एकमेकांची काळजी आहे.