Join us

आमिर खानची लेक आणि नुपूर शिखरेच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरूवात, केळवणासाठी इरानं केला महाराष्ट्रीयन लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 9:08 AM

Aamir Khan's daughter Ira Khan : आमिर खानची मुलगी इरा खान तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत जानेवारी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. त्याआधी दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू झाले आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)ची मुलगी इरा खान (Ira Khan) लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. हे जोडपे पुढच्या वर्षी लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या आमिर खानच्या मुलीची प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाली आहेत. काल इरा खान आणि नुपूरच्या लग्नाची सुरुवात केळवण सोहळ्याने झाली. या जोडप्याने त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, आमिर खानची मुलगी इरा खानने नोव्हेंबर २०२२ मध्ये तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत अधिकृतपणे एंगेजमेंट केली. आता हे जोडपे जानेवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. या जोडप्याने काल केळवण सोहळा आयोजित केला होता आणि त्यासोबतच त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. वास्तविक, इराचा होणारा नवरा नुपूर ही महाराष्ट्रीयन आहे, त्यामुळे महाराष्ट्रीयन लग्नातील हे एक महत्त्वाचे कार्य आहे.

इरा आणि नुपूरच्या केळवणचे फोटो व्हायरलइरा आणि नुपूरच्या केळवणाचे फोटो सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. फोटोत पाहायला मिळतंय की, इराने 'नोज रिंग' घातली आहे. तसेच सुंदर गुलाबी-पांढरी लहरिया साडी परिधान केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत इरा आणि नुपूरचे नातेवाईक दिसले. एकामध्ये रीना दत्ता नुपूरची आई प्रीतम शिखरेसोबत दिसली होती. इराची जवळची मैत्रीण अभिनेत्री मिथिला पालकरही तिच्यासोबत दिसली.

आधी कोर्ट मॅरेज आणि नंतर डेस्टिनेशन वेडिंगटाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, इरा आणि नुपूर ३ जानेवारी २०२४ रोजी कोर्ट मॅरेज करणार आहेत. यानंतर ते डेस्टिनेशन वेडिंगसाठी उदयपूरला जाणार आहेत. इराचे वडील आमिर १३ जानेवारीला मुंबईत आपल्या मुलीच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन देणार आहेत. रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले की, "आमिर खानची मुलगी इरा हिचे लग्न एक भव्य सोहळा असेल." रिसेप्शनसाठी आमिर स्वतः फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करत आहे. पाहुण्यांच्या यादीत तरुण कलाकारांपासून ते ज्येष्ठ अभिनेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

टॅग्स :आमिर खानइरा खान