Join us

Aamir Khan ची मुलगी Ira Khan चं बॉयफ्रेंडसोबत खुल्लम खुल्ला प्यार करेंगे, एकत्र घालवतायत वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 10:05 AM

बॉयफ्रेंड नूपूर हा आमिर खानचा फिटनेस ट्रेनर होता. आयरानेही फिटनेससाठी नूपूरकडेच ट्रेनिंग घ्यायचे ठरवले होते.जेव्हा आयरा फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली होती.

गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये बॉलीवुडचा अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानचे नूपुर शिकरेसह अफेअरच्या चर्चा रंगल्यात आहेत.पुन्हा एकदा दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खुद्द आयरानेच त्याचे हे खास फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र वेळ घालवत आहेत.

यापूर्वीही दोघेही अशा प्रकारे एन्जॉय करताना दिसले होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आयरा खान बॉयफ्रेंड नुपूरसह पुलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर होताच नेटीझन्सचेही लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर दोघांचा हा रोमँटीक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.

बॉयफ्रेंड नूपूर हा आमिर खानचा फिटनेस ट्रेनर होता. आयरानेही फिटनेससाठी नूपूरकडेच ट्रेनिंग घ्यायचे ठरवले होते.जेव्हा आयरा फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली होती. अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊसवर दोघेही निवांत क्षण एन्जॉय करताना दिसले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन झाला तरी आयराला अजिबात फरक पडणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनसाठी रेडी असल्याची पोस्टच तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. या लव्हबर्डचे  फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाले होते.  विशेष म्हणजे दोघेही सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. गेल्या वर्षीच आयरा आणि नुपूर शिखरे लॉकडाऊन दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

आयरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अनेकदा तिच्या नावाचा चुकीचा उच्चार लोकं करतात असे तिने म्हटले होते. यावर  ‘माझ नाव इरा नाही आयरा आहे. माझ्या मैत्रिणी मला चिडवतात, मला तुम्हाला सांगायचं आहे माझं नाव इरा नाही तर आयरा आहे. आय म्हणजे डोळे आण रा.. आयरा. तुम्ही सगळेच माझं नाव चुकीचं उच्चार करता त्यामुळे माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतात. मीडियामध्येही माझं नाव इरा म्हणून संबोधलं जातं. पण ते आयरा आहे.’ 

टॅग्स :इरा खानआमिर खान