Join us  

आमिर खानच्या पार्टीत शाहिद का भडकला हर्षवर्धन कपूरवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2017 9:45 AM

मौसम चित्रपटात शाहिद कपूर आणि सोनम कपूर यांच्यामधली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. सोनम कपूर आणि शाहिद कपूर यांचे कुटुंबिक ...

मौसम चित्रपटात शाहिद कपूर आणि सोनम कपूर यांच्यामधली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. सोनम कपूर आणि शाहिद कपूर यांचे कुटुंबिक संबंध ही चांगले असल्याचे समजते. मात्र आता ते संबंध यापुढे चांगले राहतील की नाही याबाबत शंका आहे. एका पार्टीत शाहिद कपूर हर्षवर्धन जे काही बोला जे ऐकल्यानंतर तुम्ही ही विचार करायला लागालं. चप्पल काढून मारु का असे शाहिद कपूर हर्षवर्धन कपूरला म्हणाला आहे. हो तुम्ही बरोबर वाचलत शाहिदने हर्षवर्धनला चप्पल काढून मारण्याची भाषा केली आहे. मात्र तुम्ही विचार करता तसे काही गंभीर घडले नाही आहे हर्षवर्धन कपूर आणि शाहिदमध्ये. त्याचे झाले असे की मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने दंगल चित्रपटाचे यश सेलिब्रेट करण्यासाठी सक्सेस पार्टीचे आयोजित केली होती. या पार्टीत आलिया भट्ट, विद्या बालन, करण जोहर यांनी हजेरी लावली होती. या पार्टीत शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसह आला होता तर हर्षवर्धन कपूर याठिकाणी आला होता.   शाहिदने पार्टीत सहभागी होण्याआधी मीडियाशी बोलत होता त्याच दरम्यान तिथून आपली बहिण सोनम कपूरसोबत हर्षवर्धन पार्टीतून बाहेर निघत होता. हर्षवर्धनने शाहिदची येऊन गळाभेट घेतली. तेवढ्यात शाहिदने हर्षवर्धन टेर खेचत म्हटले लग्न झालेले कपल पार्टीत आता येतायेत आणि यंगस्टर पार्टी सोडून पळून जातायेत. त्यावर हर्षवर्धनने उत्तर देत म्हणाला सीनिअर लोकांना जागा व्हावी यासाठी यंगस्टर जातायेत. यावर शाहिद म्हणाला सीनिअर आहे मी तुझा चप्पल फेकून मारेन. यावर हर्षवर्धनने हसला.  यावरुन शाहिद कपूर आणि हर्षवर्धन यांच्यात चांगले मैत्रीचे नाते असल्याचे समोर आले. हर्षवर्धनने मिर्झिया चित्रपटाव्दारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.