Join us

आमिर खानची निर्मिती असलेली 'लापता लेडीज' लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 12:53 PM

Lapata Ladies : किरण रावचा पहिला चित्रपट धोबी घाटला देखील प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले होते. आता १० वर्षांनंतर किरण पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून महत्त्वाची जबाबदारी घेऊन परतत आहे. लापता लेडीज पुढील वर्षी ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

आमिर खान प्रॉडक्शन्स हे नाव आज मनोरंजन उद्योगातील आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसेसपैकी एक आहे आणि ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’चा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. आजवर त्यांनी प्रदर्शित केलेले ‘रंग दे बसंती’, ‘दंगल’, ‘दिल चाहता है’ यांसारखे अनेक चित्रपट गुंतवून ठेवणारे तर आहेतच, त्याचबरोबर लक्षवेधी चित्रपट पेश करण्याच्या त्यांच्या हुशारीचे मजबूत आधारस्तंभ ठरले आहेत. हे प्रॉडक्शन हाऊस आता त्यांचा ११वा आणि सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शित होण्याची तयारी करत आहे, ‘लापता लेडीज’ या त्यांच्या नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना मोठी अपेक्षा आहे.

आमिर खान प्रॉडक्शन्सचा ‘लापता लेडीज’ हा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे. प्रतिभा राणा, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल या प्रतिभावान कलावंताच्या अदाकारीने नटलेल्या टीझरमधून हे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटाद्वारे मध्य प्रदेशातील आणखी एक कहाणी कथन केली जाणार आहे. हे नमूद करणे अधिक प्रशंसनीय आहे की, ‘आमीर खान प्रॉडक्शन्स’ने नेहमीच विविध प्रकारच्या आगळ्यावेगळ्या कथानकांचा शोध घेतला आहे आणि त्यांच्या चित्रपटांद्वारे उत्तम संशोधन केलेले आणि भरभरून रंजन करणारे कथानक पेश केले आहे.

किरण रावचा पहिला चित्रपट धोबी घाटला देखील प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले होते. आता १० वर्षांनंतर किरण पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून महत्त्वाची जबाबदारी घेऊन परतत आहे. लापता लेडीज पुढील वर्षी ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. रवी किशन या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील सर्वच व्यक्तिरेखा टीझरमध्ये खूपच मनोरंजक दिसत आहेत. हा चित्रपट २००१ मधील ग्रामीण भारताची कथा देखील सादर करतो, जिथे एक मुलगा आणि मुलगी एकमेकांना न पाहताच लग्न करतात. 

टॅग्स :आमिर खानकिरण राव