Join us

‘सांड की आंख’मध्ये दिसणार आमिर खानची बहिण निखत खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 15:32 IST

अनुराग कश्यप निर्मित ‘सांड की आंख’ या चित्रपटाची घोषणा झाली आणि हा चित्रपट चर्चेत आला. शूटर दादी चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यावर आधारित आणि तापसी पन्नू व भूमी पेडणेकर स्टारर या चित्रपटाचे शूटींग जवळपास पूर्ण झालेय. पण याचदरम्यान एक ताजी बातमी आहे.

ठळक मुद्दे‘सांड की आंख’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, येत्या २५ आॅक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

अनुराग कश्यप निर्मित ‘सांड की आंख’ या चित्रपटाची घोषणा झाली आणि हा चित्रपट चर्चेत आला. शूटर दादी चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यावर आधारित आणि तापसी पन्नू व भूमी पेडणेकर स्टारर या चित्रपटाचे शूटींग जवळपास पूर्ण झालेय. पण याचदरम्यान एक ताजी बातमी आहे. होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची बहीण निखत खान ‘सांड की आंख’ या चित्रपटाद्वारे आपला बॉलिवूड डेब्यू करतेय.पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सांड की आंख’ या चित्रपटात शूटर दादीशिवाय आणखी काही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहेत. यापैकी एक व्यक्तिरेखा निखत खान साकारताना दिसणार आहे. यात निखत महाराणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. संपूर्ण चित्रपटात तिचे महत्त्वपूर्ण पात्र आहे.‘सांड की आंख’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, येत्या २५ आॅक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. निधी परमार व अनुराग कश्यप निर्मित हा चित्रपट तुषार हिरनंदानी दिग्दर्शित करतोय.

कोण आहे निखत खानही निर्माता ताहिर खान व जीनत हुसैन यांची मुलगी आहे. शिवाय आमिरची बहीण आहे. अर्थात आमिरची बहीण हीच निखतची ओळख नाही तर निर्माता अशी तिची आणखी एक ओळख आहे. ९० च्या दशकात ‘तुम मेरे हो’ हा चित्रपट तिने तिच्या वडिलांसोबत मिळून प्रोड्यूस केला होता. २००२ मध्ये ‘हम किसी से कम नहीं’ या चित्रपटात तिने कॉस्च्युम असिस्टंट म्हणून काम केले होते. आमिरला निखत व फरहत या दोन बहीण आणि फैजल नावाचा एक भाऊ आहे. निखतला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

 

टॅग्स :आमिर खान