आमिर खानला पत्नीने तब्बल तीन आठवडे रूममध्ये केले होते बंद, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2017 9:15 AM
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानला त्याच्या पत्नीने तब्बल तीन आठवडे एका रूममध्ये बंद केले होते, वाचा सविस्तर!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान चित्रपटांप्रमाणेच त्याच्या वैवाहिक जीवनातही परफेक्ट आहे असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. वर्षातूनच एकच चित्रपट करणाºया आमिरने गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आमिरच्या या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. त्याच्या या वर्षात रिलीज झालेल्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटानेही एक रेकॉर्ड निर्माण केला. या चित्रपटाला तायवानच्या बॉक्स आॅफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. असो, आज आम्ही आमिर खानशी संबंधित एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. होय, हा किस्सा त्याची पत्नी किरण राव हिच्याशी निगडीत असून, तिने एकदा आमिरला तब्बल तीन आठवडे एका रूममध्ये बंद करून ठेवले होते. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. हा किस्सा आमिर खान स्टारर ‘धोबीघाट’ या चित्रपटाशी संबंधित आहे. २०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘धोबीघाट’ या चित्रपटाला आमिरची पत्नी किरण राव हिने डायरेक्ट केला आहे. त्याचबरोबर लेखक म्हणूनही किरणने भूमिका पार पाडली आहे. किरण रावच्या मते, हा चित्रपट चार लोक आणि मुंबई शहराशी संबंधित आहे. हे चार लोक सर्वसामान्य असतात, परंतु तेवढेच खास असतात. कारण या चौघांचेही आयुष्य, अपेक्षा, एकटेपणा, नुकसान आणि प्रेम याच्या अवतीभोवती व्यतित होत असते. बºयाच कमी लोकांना माहिती आहे की, चित्रपटात आमिरने केवळ किरणच्या हट्टामुळे भूमिका साकारली होती. या चित्रपटाची शूटिंग मुंबईतील मोहम्मद अली रोड या अतिशय गजबजलेल्या ठिकाणी केली जाणार होती. त्यामुळे किरणला प्रश्न पडला होता की, एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी आमिर जाणार कसा? कारण याभागात दररोज त्याला शूटिंग करणे खूपच अवघड होणार होते. किरण रावने यावर तोडगा काढण्यासाठी एक शक्कल लढविली. ती आमिरला रात्री तीन वाजेच्या दरम्यान या परिसरातील एका छोट्याशा रूममध्ये घेऊन गेली. तिने आमिरला म्हटले की, तुला तीन आठवडे या रूममध्ये राहावे लागणार आहे. पुढे आमिरला जोपर्यंत शूटिंगचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तब्बल आठवडे त्याच रूममध्ये राहावे लागले. विशेष म्हणजे ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटासंबंधी त्याच्याशी चर्चा करण्यासाठी दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि निर्माता विधू विनोद चोपडा यांनाही याच रूममध्ये आमिरची भेट घ्यावी लागली.