Join us  

'तनु वेड्स मनु 3' सिनेमा कधी येणार ? दिग्दर्शक आनंद एल राय यांनी थेट सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 4:16 PM

 'तनु वेड्स मनू'चा पहिला भाग हा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर  2015 मध्ये आलेल्या 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.

Tanu Weds Manu 3 : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि अभिनेता आर माधवन (R. Madhavan) यांची प्रमुख भूमिका असलेला 'तनु वेड्स मनु' (tanu weds manu 3) या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. चित्रपटांच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता चाहत्यांना तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. 'तनु वेड्स मनु 3' चित्रपट कधी येणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. आता थेट चित्रपटाच्या दिग्दर्शकाने यावर खुलासा केला आहे. 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक आनंद एल राय यांनी 'तनु वेड्स मनु 3'वर भाष्य केलं. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना ते म्हणाले, 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' सिनेमाचा शेवट जिथे झाला. तेथूनच तिसरा भाग सुरू होणार का, असे अनेक प्रश्न आहेत. पण, हे फक्त कथेवर अवलंबून आहे. आम्ही कथेवर काम करत आहोत. ही एक मोठी जबाबदारी आहे. ज्या दिवशी कथा तयार होईल. त्याच्यानंतर लगेचच शुटिंगला सुरूवात होईल".

पुढे ते म्हणाले, "या सिनेमातून जर मला फक्त पैसाच कमवायचा असेल तर मी आता पुढच्या तीन महिन्यातच शुटिंग सुरू करु शकतो. पण, जर कथा आणखी मजबूत सादर करायची असेल तर मला त्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागेल. सध्या काम जोरात सुरू आहे".  याशिवाय  'तनु वेड्स मनु रिटर्न्स'च्या यशानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर बोलताना त्यांनी थोडं दडपण असल्याचं त्यांनी कबूल केले आहे. 

 'तनु वेड्स मनू'चा पहिला भाग हा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर  2015 मध्ये आलेल्या 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आणि तेव्हापासून या चित्रपटाचे चाहते 'तनू वेड्स मनु 3' ची वाट पाहत आहेत. 2025 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.तनु वेड्स मनु चित्रपटाच्या अभिनयासाठी कंगना रनौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्कारनं गौरवण्यात आलं होतं. सध्या कंगनाचा 'इमर्जन्सी' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

टॅग्स :कंगना राणौतआर.माधवनसिनेमा