Join us

ऐश्वर्याची कार्बन कॉपी वाटते आराध्या, ऐश्वर्याच्या बालपणीचा फोटो पाहून तुमचाही बसेल विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 17:16 IST

इतर स्टार किडप्रमाणे आराध्यादेखील चर्चेत असते.

आराध्या बच्चन ही अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आहे. ऐश्वर्या व अभिषेक यांचं लग्न 2008 साली झाले होते. इतर स्टार किडप्रमाणे आराध्यादेखील चर्चेत असते. बऱ्याचदा आराध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत येते. ती ऐश्वर्याची कार्बन कॉपी असल्याचं नेहमी बोललं जातं आणि त्यांची तुलनादेखील केली जाते. 

बच्चन कुटुंबाची नात असल्यामुळे चाहत्यांना आराध्यादेखील अभिनेत्री होणार का, हा प्रश्न पडत असतो.

ऐश्वर्याला आराध्यासोबत काम करण्याबाबत विचारले असता तिने सांगितलं की, मला माहित नाही की मी व माझ्या मुलीच्या बाबतीत जीवनात काय लिहिलेलं आहे. आम्ही प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकत्र काम करण्याची गोष्ट ते पुढे पाहता येईल.

ऐश्वर्या नेहमी आराध्याचा हात पकडून असते. त्यामुळे बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

आराध्या मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते आहे. ऐश्वर्या कित्येकदा आराध्यासोबत शाळेतील फंक्शनसाठी जाते व मुलीला चिअरअप करताना दिसते.

इतकंच नाही तर ऐश्वर्या स्वतः आराध्याला शाळेतून आणायला जाते.

त्या दोघांमध्ये खूप चांगलं बॉण्डिंग असल्याचं पहायला मिळतं.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन