ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन आज ८ वर्षांची झाली आहे. या निमित्ताने बच्चन कुटुंब सेलिब्रेशन करते. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आराध्या हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसते आहे.
फोटोमध्ये आराध्याचे हेअरस्टाईल आई ऐश्वर्यासारखीच केली आहे आणि तिने हेअरबॅण्ड लावलेला दिसतो आहे. दोघांनी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत. आराध्या व ऐश्वर्या यांचे फोटो पाहून हैराण झालेत आणि दोघांची तुलना करू लागले होते. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लाडकी आराध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.
इतकंच नाही तर ऐश्वर्या स्वतः आराध्याला शाळेतून आणायला जाते.