Join us

लग्नानंतर स्वत: गाडी चालवत सासरी गेली अभिनेत्री, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 15:52 IST

लग्नानंतर सासरी जाताना आरतीने स्वत: गाडीचं स्टेअरिंग हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

अभिनेता गोविंदाची भाची आणि प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि अभिनेत्री आरती सिंह नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आरतीने दीपक चौहानशी लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटामाटात आरतीचा विवाहसोहळा संपन्न झाला. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

आरती सिंह आणि दीपक चौहान यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत २५ एप्रिलला लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर सासरी जाताना आरतीने स्वत: गाडीचं स्टेअरिंग हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आरती तिचा पती दीपकसह बसल्याचं दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

लग्नासाठी आरतीने खास लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तर दीपक शेरवानी सूटमध्ये दिसून आला. त्यांच्या लग्नाला कपिल शर्मा, अर्चना सिंह, पारस छाबड़ा, माहिरा शर्मा, तुषार कपूर, प्रियांका चहर चौधरी, अंकिता गुप्ता, शेफाली जरीवाला, देवोलिना भट्टाचार्जी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर मतभेद विसरून भाचीच्या लग्नाला गोविंदाही हजर होता. 

टॅग्स :कृष्णा अभिषेकसेलिब्रेटी वेडिंग