Join us

अरुणोदय सिंहची पत्नी ली एल्टनचा घटस्फोटावरून यू-टर्न, कुत्र्यांच्या भांडणांमुळे झाले होते वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 1:09 PM

बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह आणि त्याची एक्स पत्नी ली एल्टन यांचं नातं सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह आणि त्याची एक्स पत्नी ली एल्टन यांचं नातं सध्या चर्चेत आहे. ली एल्टनने भोपाळमधल्या कौंटुबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिल्याची माहिती समोर येते आहे. या न्यायालयाने जबलपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाचा निकाल सुनवला होता. 13 डिसेंबर 2016 मध्ये दोघांचे लग्न झालं होते तर 2019 मध्ये भोपाळ फॅमिली कोर्टात दोघांचा घटस्फोट झाला होता. अरुणोदयसोबतच्या नात्यात कटूता आल्यानंतर ली एल्टन कॅनडाला परतली होती.  

उच्च न्यायालयात याचिका दाखलअरुणोदयची एक्स पत्नी ली एल्टनने जबलपूर उच्च न्यायालयातील कौटुंबिक कोर्टाकडून घटस्फोटाला आव्हान दिलं असून तिने हा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये लीने म्हटले आहे की, तिला घटस्फोटासंदर्भातली  कोणतीही माहिती दिलेले नाही आणि 18 डिसेंबर 2019 रोजी एकतर्फी घटस्फोट देण्याल आला.  पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार आहे.

लग्नाच्या काही दिवसांत उडायला लागले खटकेलग्नाच्या काही दिवसांतच दोघांमध्येही वाद होऊ लागले.दिवसेंदिवस या दोघांमध्ये खटके उडू लागले. विशेष म्हणजे या दोघांचे वाद अगदी छोट्या छोट्या कारणांमुळे होत असायचे. घटस्फोट घेण्यालालाही अगदी छोटं कारण समोर आले आहे. एल्टन आणि अरुणोदय या दोघांच्याही कुत्र्यांची भांडण झाली. कुत्र्यावरून सुरू झालेला वाद या दोघांनी पर्सनली घ्यायला सुरूवात केली त्यानंतर दोघांमध्येही वाद वाढत गेले. 

अशी सुरु झाली होती लव्हस्टोरीअरूणोदय आणि एल्टन दोघांची भेट गोव्यात झाली होती. तिथून त्यांची मैत्रीला सुरूवात झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. दोघांच्या आवडी- निवडी जुळल्यानंतर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. अरूणोदयने 'आएशा', 'ये साली जिंदगी', 'जिस्म 2', 'मैं तेरा हीरो', 'बुद्धा इन अ ट्रैफिक जाम', 'मोहनजोदाड़ो' आणि 'ब्लैकमेल' सारख्या सिनेमात तो झळकला आहे. नुकताच अरूणोदय वेब सीरिज 'अपहरण' मध्येही झळकला होता. 

टॅग्स :बॉलिवूडघटस्फोट