‘आशिकी’ फेम ‘हा’ अभिनेता आता असा दिसतो; पत्नीने काढले आहे घराबाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 3:41 PM
‘आशिकी’, ‘सडक’, ‘खिलाडी’ यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा अभिनेता दीपक तिजोरी गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. नुकतेच ...
‘आशिकी’, ‘सडक’, ‘खिलाडी’ यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा अभिनेता दीपक तिजोरी गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. नुकतेच त्याला नीरज वोरा यांच्या फ्यूनरलमध्ये बघण्यात आले. यादरम्यान तो खूपच बदललेल्या अवस्थेत दिसून आला. दाढी वाढलेली, डोक्याचे केस पांढरे झालेल्या दीपकचा हा अवतार बघून त्याला ओळखणे अवघड झाले होते. काही महिन्यांपूर्वी दीपक त्याची पत्नी शिवानी तनेजा हिच्यामुळे चर्चेत आला होता. कारण अशा बातम्या समोर आल्या होत्या की, दीपकच्या पत्नीने मुलगी समाराच्या पालनपोषणासाठी प्रतिमहिना एक लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र दीपक ही रक्कम देण्यास असमर्थ ठरला होता. त्यानंतर या रकमेत कपात करण्यात आली. एक लाख रुपयांवरून ४० हजार रुपयांची मागणी दीपकच्या पत्नीने केली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून लाइमलाइटपासून दूर असलेल्या दीपकची पैसे देण्याची स्थिती नसल्याने दोघा पती-पत्नीमधील वाद चांगलाच चिघळला होता. त्यातच दीपकचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे त्याच्या पत्नीच्या लक्षात आल्याने तिने त्याला घराबाहेर काढले होते. दीपक पत्नी शिवानी आणि मुलांबरोबर गोरेगाव येथील ४ बीएचके फ्लॅटमध्ये राहात होता. मात्र शिवानीला दीपकचे योगा ट्रेनरसोबत अफेअर असल्याचे समजताच तिने त्याला घराबाहेर काढले. पुढे शिवानीने त्याच्या विरोधात बांद्रा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला. तसेच पोटगीची मागणी केली. मात्र या वादात दीपकला असे समजले की, त्याचे लग्नच बेकायदेशीर होते. कारण दीपक शिवानीचा दुसरा पती आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट न घेताच शिवानीने दीपकसोबत लग्न केले. त्यामुळे हे लग्न कायदेशीररीत्या मान्य नसल्याची बाब समोर आली. दरम्यान, या दोघांना दोन मुले आहेत. मुलगी समारा २० वर्षांची असून, लहान मुलाचे नाव करण आहे.