Join us

All Is Well राहुल रॉयच्या तब्येतीत होतेय सुधारणा, हॉस्पिटलमध्ये 'ही' व्यक्ती घेतेय त्यांची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 11:24 AM

बहिण प्रियंका रॉय राहुल यांच्या सोबत असून दिवस रात्र त्यांची काळजी घेतेय.सध्या राहुल रॉय मीरा रोडवरील वोखर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. सध्या राहुल यांच्यावर स्पीच थेरपी चालु आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल यांना ब्रेन स्ट्रोक आला होता त्यानंतर तातडीने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. राहुल यांना ब्रेनस्ट्रोक आला होता, तेव्हा ते कारगिलमध्ये 'एल ए सी- लाइव्ह द बॅटल' सिनेमासाठी शूट करत होते. ब्रेन स्ट्रोकनंतर राहुल यांना तातडीने श्रीनगर, त्यानंतर मुंबईला आणण्यात आले. सध्या अभिनेता नानावटी हॉस्पिटलमधून वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले गेले आहे. 

हळुहळु राहुल रॉयच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. सध्या तरी राहुल रॉय हॉस्पिलमध्येच उपचार घेत आहे. नुकताच राहुल रॉयने चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नास्ता करताना दिसत आहे. तसेच शेअर केलेल्या फोटोत त्यांनी १९ व्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ब्रेकफास्ट एन्जॉय करत असल्याचे म्हटले आहे. बहिण प्रियंका रॉय राहुल यांच्या सोबत असून दिवस रात्र त्यांची काळजी घेतेय.सध्या राहुल रॉय मीरा रोडवरील वोखर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. सध्या राहुल यांच्यावर स्पीच थेरपी चालु आहे.

राहुल स्वत: आता सतत आपल्या इन्स्टाग्रामवर आपले नवीन फोटो शेअर करत असतात. या फोटोंमध्ये राहुल खूप बारीक झालेले दिसतायेत. वयाच्या 52 व्या वर्षीही स्मार्ट आणि तंदुरुस्त दिसणारा राहुल या फोटोंंमध्ये खूप थकलेले दिसतायेत. साहजिकच, शस्त्रक्रियेनंतर राहुल यांच्या चेहऱ्यात आणि शरीरात अनेक बदल झालेले असणार.

याशिवाय अभिनेत्याने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात राहुल यांची जीभ अडखळताना दिसतेय. जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकले तर राहुल काय बोलत आहे हे स्पष्टपणे समजले आहे. वास्तविक, ब्रेन स्ट्रोकनंतर राहुल यांच्या बोलण्यावर परिणाम झाला आहे. राहुल यांच्या या स्थितीला एफेसिया असे म्हणतात, ज्यामध्ये व्यक्तीच्या बोलण्यावर, लिहिण्यावर आणि समजण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

राहुल रॉय यांनी १९९० मध्ये 'आशिकी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यावेळी तो लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यानंतर त्याने ४७ सिनेमे साइन केले होते. 

टॅग्स :राहुल रॉय