अभय देओल अभिनयासोबतच त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखला जातो. मनात काही शंका असल्यास अभयची ही पोस्ट तुम्ही आवर्जुन वाचायला हवी. होय, अभयने अशी काही पोस्ट टाकली की, चाहते हैराण झालेत. होय, या पोस्टमध्ये अभयने दिग्दर्शकासोबत झोपल्याचा खुलासा केला. धक्का बसला ना? नुकताच अभयने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो एका लाकडाच्या खुर्चीवर झोपलेला दिसतोय. त्याच्या बाजूलाच फोल्डिंगच्या खुर्चीवर दिग्दर्शक महेश मांजरेकरही झोपलेले आहे. दोघेही या फोटोत डुलकी घेत आहेत. अभयने महेश मांजरेकरांसोबतचा हा फोटो शेअर करत त्याला एक मजेशीर कॅप्शन दिले.
‘शेवटी मी हे केलेच. माझ्या दिग्दर्शकासोबत मी झोपलो. महेश मांजरेकर यांच्यासोबत सेटवर. मी हॉटस्टार आहे,’ असे कॅप्शन अभयने या फोटोला दिले. अभय देओल सध्या हॉटस्टारच्या एका वेब सीरिजचे शूट करत आहे. 1962च्या भारत-चीन युद्धावर आधारित असलेल्या या वेब सीरिजचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. ही वेबसीरिज हॉटस्टारची सर्वात महागडी वेब सीरिज असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी अभय देओल नेटफ्लिक्सवरच्या ‘चॉपस्टिक’ या वेबसीरिजमध्ये दिसला होता.
२००५ मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अभयच्या अपोझिट आयशा टाकिया होती. यातील अभयचा अभिनय लोकांना आवडला होता.
यानंतर आहिस्ता-आहिस्ता, हनीमून ट्रॅव्हल्स प्राय.लिमिटेड, एक चालीस की लास्ट लोकल, देव डी, आयशा, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शंघाई, हॅपी फिर भाग जाएगी, नानू की जानू अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले. अभय हा ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांचा भाऊ अजीत देओल यांचा मुलगा आहे.