Join us

अक्षय कुमार ‘गरिबांचा मिथुन चक्रवर्ती’ होता, माझ्यामुळे...! अभिजीत भट्टाचार्यचा आणखी एक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 1:10 PM

एकेकाळी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारा, आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारा गायक अभिजीत भट्टाचार्य आताश: फक्त  वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेत असतो....

ठळक मुद्देकाही वर्षांपूर्वी माझ्यामुळेच शाहरूख खान स्टार झाला, असे अभिजीत म्हणाला होता.

एकेकाळी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारा, आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारा गायक अभिजीत भट्टाचार्य ( Abhijeet Bhattacharya)आताश: फक्त  वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेत असतो. 90 आणि 20च्या दशकात अभिजीतच्या गाण्यांनी धूम केली होती. आता तो बॉलिवूडमधून पुरता गायब आहे. पण आता अभिजीत एक वेगळेच विधान करून चर्चेत आला आहे. मी अभिनेत्यांसाठी नाही तर फक्त स्टार्ससाठी गातो. शाहरूख खान व सुनील शेट्टी स्टार आहेत आणि मी दोघांसाठीही गायले, असे अभिजीत म्हणाला. इतकेच माझ्या गाण्यांमुळेच अक्षय कुमार (Akshay Kumar ) स्टार झाला, असा दावाही त्याने केला. ( Abhijeet Bhattacharya says Akshay Kumar was  Gareebo Ka Mithun Chakraborty)

‘इंडिया डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने अक्षय कुमारचे उदाहरण दिले. गाण्यांमुळे एखादा कलाकार हा सुपरस्टार होऊ शकतो आणि अक्षय कुमार त्याचे उदाहरण आहे, असे तो म्हणाला.माझ्या गाण्यांमुळे अक्षय कुमार स्टार झाला. जेव्हा तो आला तेव्हा स्टार नव्हता. ‘गरिबांचा मिथुन चक्रवर्ती’ म्हणून ओळखला जात होता. ज्याप्रमाणे मिथुन चक्रवर्तीला ‘गरीबांचा अमिताभ बच्चन’ म्हटले जायचे. तसेच  अक्षयला ‘गरीबांचा मिथुन चक्रवर्ती’ म्हणून लोक ओळखायचे. माझ्याच गाण्यांमुळे अक्षय स्टार झाला. गाण्यांमुळे देव आनंद, राज कपूर आणि राजेश खन्ना स्टार झाले होते. अक्षय कुमारचेही तसेच.  ‘खिलाडी’नंतर तो स्टार झाला,असे त्याने सांगितले. तुम्हाला ठाऊक असेलच की, 1992 साली प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या ‘खिलाडी’ सिनेमातील ‘वादा रहा  सनम’ हे गाणे अभिजीत यांनीच गायले होते.

काही वर्षांपूर्वी माझ्यामुळेच शाहरूख खान स्टार झाला, असे अभिजीत म्हणाला होता. ‘माझ्या आवाजाने शाहरूख बॉलिवूडचा किंगखान बनला. माझ्या आवाजाने त्याला सुपरस्टार बनवले. जोपर्यंत मी त्याच्यासाठी गाणी गायलीत, तोपर्यंत तो रॉकस्टार होता. पण मी त्याच्यासाठी आवाज देणे बंद केले आणि तो ‘लुंगी डान्स’वर आला, असे अभिजीतने म्हटले होते. शाहरूखला आवाज देणे का बंद केले, हेही त्याने सांगितले होते. ‘मैं हू ना’मध्ये सिंगर सोडून सगळ्यांना दाखवण्यात आले. ‘ओम शांती ओम’मध्येही हेच झाले. सर्व स्टार्स दिसले. पण सिंगर्स गायब होते. शाहरूख माझ्या आवाजावर नाचत होता; पण मी त्यांच्यासोबत नव्हतो. यामुळे माझा आत्मसन्मान दुखावला, असे अभिजीतने सांगितले होते.

टॅग्स :अभिजीत भट्टाचार्यअक्षय कुमार