Join us

काही लोक कुत्र्यासारखे भुंकतात आणि...! अभिजीत भट्टाचार्य का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:22 PM

खुबसुरत, मै कोई ऐसा गीत गाऊ, सुनो ना सुनो ना, बडी मुश्कील है सारखी सुपरहिट गाणी गाणारे अभिजीत भट्टाचार्य सध्या बॉलिवूडपासून दूर आहेत. पण म्हणून त्यांची चर्चा कमी नाही.

ठळक मुद्देअन्य एका मुलाखतीत अभिजीत यांनी ‘इंडियन आयडल 12’ व अमित कुमार वादावरही प्रतिक्रिया दिली.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांच्या आवाजाची जादू आज भलेही फिल्मी पडद्यापासून दूर आहे. पण ते आजही म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वात बहारदार गायकांपैकी एक आहेत. आता अभिजीत यांना त्यांच्या गायकीसाठी कमी आणि वादांसाठी जास्त ओळखले जाते. पण यात जराही दुमत नाही की, एकेकाळी अभिजीत एका सुपरस्टारचा आवाज होते.  खुबसुरत, मै कोई ऐसा गीत गाऊ, सुनो ना सुनो ना, बडी मुश्कील है यांसारखी शेकडो सुपरहिट गाणी गाणारे अभिजीत  सध्या बॉलिवूडपासून दूर आहेत. पण म्हणून त्यांची चर्चा कमी नाही.आता काय तर अनेक गायक कुत्र्यासारखे भुंकतात आणि त्याला गाणं म्हणतात, असे त्यांनी म्हटलेय.

‘बॉलिवूड स्पाय’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी ऑटोट्यूनच्या मदतीने गाणा-या सिंगरवर जबरदस्त भडास काढली. हे सगळे स्वत:ला सिंगर म्हणून घेतात आणि  कुत्र्यासारखे भुंकतात. विशेष म्हणजे, त्यालाच गाणं समजतात. एकेकाळ लोक एक गाणं गाण्यापूर्वी तासन तास रियाज करायचे. एक सूर चुकला तरी पुन्हा पुन्हा गायचे. पण आज काळ बदलला आहे. काही जण कुत्र्यांसारखे भुंकतात. त्याला ऑटोट्यूनमध्ये एडिट करतात अन् याला गाणं म्हणून प्रेक्षकांसमोर सादर करतात. ही लोकांची शुद्ध फसवणूक आहे. आमच्या पिढीच्या गायकांना आज काम नाही. कारण आम्हाला त्यांच्यासारखं गाणं गाता येत नाही. मी लोकांना फसवत नाही, याचे मात्र समाधान आहे, असे अभिजीत म्हणाले.  

इंडियन आयडल वादावर दिली प्रतिक्रियाअन्य एका मुलाखतीत अभिजीत यांनी ‘इंडियन आयडल 12’ व अमित कुमार वादावरही प्रतिक्रिया दिली. मी अमित कुमारांशी बोललो आहे. या वादाला विनाकारण प्रसिद्धी देण्यात आली. अमित कुमारांनी असे काहीही म्हटलेले नाही. ना त्याचा ऑडिओ आहे, ना व्हिडीओ. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे ते म्हणाले. ‘इंडियन आयडल 12’च्या स्पर्धकांचे त्यांनी भरभरून कौतुकही केले. इंडियन आयडलच्या स्पर्धकांनी आपले टॅलेंट दाखवले. सर्व अद्भूत गातात, असे ते म्हणाले.

टॅग्स :अभिजीत भट्टाचार्य