सन 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटाने कोट्यवधी चाहत्यांना वेड लावले होते. या चित्रपटातील अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीची आॅन स्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली होती. आता या चित्रपटाच्य चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय,‘बंटी और बबली’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरु झाली आहे. दिग्दर्शक शाद अली आपल्या या सुपरहिट चित्रपटाचर सीक्वल बनवत आहेत.डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच या सीक्वलवर काम सुुरू होईल. ‘बंटी और बबली अगेन’ असे या चित्रपटाचे नाव असेल. अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी पुढील महिन्यापर्यंत या चित्रपटाचे शूटींग सुरु करतील.
‘बंटी और बबली’ चा सीक्वल येणार, अशी बºयाच दिवसांपासून चर्चा होती. पण मध्यंतरी हा सिनेमा थंडबस्त्यात पडला होता. पण आता चित्रपट येणार हे नक्की झालेय. ‘बंटी और बबली’ हा चित्रपट अभिषेक बच्चनच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही या चित्रपटाला भरभरून दाद दिली होती.
अभिषेकचे वडील अमिताभ बच्चन हेही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. शिवाय अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन ही सुद्धा चित्रपटातील एका गाण्यात झळकली होती. अभिषेक, अमिताभ आणि ऐश्वर्या यांच्यावर चित्रीत कजरारे... हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. तूर्तास ‘बंटी और बबली’चा सीक्वल येणार, हे फायनल आहे. या सीक्वलमध्ये ओरिजनल स्टारकास्ट दिसणार, हेही ठरलेय. पण यात बिग बी दिसणार की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.