Join us

अभिषेक बच्चनने जुहूमध्ये खरेदी केला नवीन फ्लॅट, 'जलसा' बंगल्याजवळच आहे आलिशान अपार्टमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:14 IST

बच्चन कुटुंबाचे जुहू या भागात ५ बंगले आणि लक्झरीयस फ्लॅट्स आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) वैयक्तिक कारणांमुळेच चर्चेत आहे. पत्नी ऐश्वर्यासोबत त्याचं बिनसल्याची चर्चा आहे. तो आजकाल ऐश्वर्या आणि आराध्यासोबत दिसतही नाही. दर मायलेकीही अभिषेकशिवायच दिसतात. आता अभिषेकबाबतीत आणखी एक बातमी अशी की त्याने मुंबईतील जुहू येथे फ्लॅट  खरेदी केला आहे. विशेष म्हणजे हा फ्लॅट अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याजवळच आहे.

बच्चन कुटुंबाचे जुहू या भागात ५ बंगले आणि लक्झरीयस फ्लॅट्स आहेत. बऱ्याच प्रॉपर्टी या एकाच बिल्डरच्या आहेत जो अमिताभ यांचा चाहता आहे. बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अभिषेकने नुकतंच जुहूमध्ये आणखी एका फ्लॅटची डील केली आहे. हा फ्लॅट त्यांच्याच जलसा बंगल्याजवळ आहे. मात्र हे अपार्टमेंट त्याने वेगळ्या बिल्डरकडून घेतलं आहे. अभिषेकने गुंतवणूक केलेला फ्लॅट अतिशय आलिशान असून बीच व्ह्यू देखील आहे. फक्त अभिषेकच नाही तर अभिनेता अक्षय कुमारनेही याच अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला आहे.

अभिषेक बच्चनने दोन महिन्यांपूर्वीच ओबेरॉय रिएल्टीच्या प्रोजेक्टमध्ये ६ अपार्टमेंट खरेदी केले होते. ZAPCY च्या रिपोर्टनुसार या प्रॉपर्टीवर १५.४२ कोटी रुपये खर्च केले. आता आणखी एक प्रॉपर्टी घेतल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे.

काही महिन्यांपूर्वी अभिषेक बच्चनचा 'घूमर' सिनेमा आला होता. यामध्ये तो क्रिकेट कोचच्या भूमिकेत होता. आता त्याच्या आगामी 'धूम 4' चर्चा आहे. यासाठी त्याने लूकही बदलल्याचं समोर आलं.

टॅग्स :अभिषेक बच्चनसुंदर गृहनियोजनमुंबई