Join us

​ऐश्वर्या रायसोबत काम करण्यास का दिला अभिषेक बच्चनने नकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2016 2:13 PM

बॉलीवूडमधील रॉयल कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमाचे आदर्श लग्न म्हणून उदाहरण दिले जाते. परंतु रिअल लाईफमधील ...

बॉलीवूडमधील रॉयल कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमाचे आदर्श लग्न म्हणून उदाहरण दिले जाते. परंतु रिअल लाईफमधील त्यांचा हा रोमान्स अभिषेकला मोठ्या पडद्यावर साकारण्याची इच्छा नाही. म्हणून तर त्याने आगामी चित्रपटात ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार दिला असल्याचे कळतेय.प्रभूदेवा दिग्दर्शित ‘लेफ्टी’ नावाच्या सिनेमातून बॉलीवूडमध्ये धमाकेदार पुनरागमन करण्याचा अभिषेकचा बेत आहे. करिअरच्या खाली जाणाºया आलेखाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी हा चित्रपट त्याच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जातोय. म्हणून तर तो याबाबत कोणत्याच प्रकारची जोखिम घेऊ इच्छित नाही.हेच कारण आहे की, जेव्हा मुख्य अभिनेत्री म्हणून ऐश्वर्याचे नाव समोर येऊ लागले तेव्हा अभिषेकने विरोध केला. ऐश्वर्याने करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’द्वारे यशस्वी पुनरामगन केले. मध्यंतरी कमी झालेल्या तिच्या स्टारडमला नव्याने झळाळी मिळाली. त्यामुळे ऐश्वर्याच्या लोकप्रियतेचा ‘लेफ्टी’ला लाभ मिळू शकतो असा विचार करून तिची निवड व्हावी म्हणून प्रयत्न सुरू होते. विशेष म्हणजे ऐश्वर्यादेखील अभिषेकसोबत काम करण्यास उत्सुक आहे.पण अभिषेकने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार दिला. सुत्रांनुसार, त्याला या चित्रपटासाठी एक नवा चेहरा हवा असून स्वत:च्या दमावर सिनेमा हिट करून दाखवायचा आहे. ऐश्वर्याच्या लोकप्रियतेमुळे तो झाकोळला जाईल अशी त्याला भीती वाटतेय.अमिताभ-जयाच्या ‘अभिमान’सारखीच त्याची गत झाली आहे, असे म्हणावे लागेल. अद्याप चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा केली गेलेली नसल्यामुळे ऐश्वर्याचा पत्ता कट होणार की, ती लाडक्या हबीसोबत रोमान्स करताना दिसणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अभिषेकचे अलिकडच्या काळातील सर्व सिनेमे फ्लॉप ठरले असून त्याला एका सुपरहिट सिनेमाची गरज आहे.