अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. या जोडीला प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्च यांच्या लग्नाला आता १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या १७ वर्षात त्यांचं नातं आणखीनच घट्ट होत गेलं. त्यांच्यातील मैत्री आणि प्रेम दोन्ही वाढलं. इतर जोडप्यांप्रमाणे त्यांच्यातही भांडणं होतात. एवढंच काय तर त्यांच्या घटस्फोटच्या चर्चांदेखील कधी-कधी रंगताना दिसतात. पण, अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी कधीही अफवांवर भाष्य केलं नाही. प्रेम आणि कुटुंब असलं तरीही दोघांनाही एकमेकांच्या काही गोष्टी खटकतात. अशीच ऐश्वर्याबद्दल एक गोष्ट आहे, जी अभिषेक बच्चनला आजिबात आवडत नाही.
सध्या सोशल मीडियावर अभिषेकच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिषेकने पत्नी ऐश्वर्याबद्दल काय आवडतं आणि काय आवडत नाही याबद्दल बोलताना दिसतोय. हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. ज्यामध्ये अभिषेक म्हणताना दिसतो, "ऐश्वर्याची आवडणारी गोष्ट म्हणजे तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे तिची पॅकिंग करण्याची पद्धत. ती ज्या पद्धतीने पॅकिंग करते, त्याचा मला प्रचंड त्रास होतो".
गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. अशीच एक अफवा २०१४ साली पसरली होती, जेव्हा अभिषेकने ती नाकारली होती. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर टाइम्स नाउ डॉटच्या रिपोर्टनुसार, मणिरत्नम हे अभिषेक आणि ऐश्वर्यासोबत सिनेमा बनवणार आहेत. त्यासाठी त्यांना इंटरेस्टिंग कथा मिळाली आहे. याआधी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी मणिरत्नम यांच्या गुरू सिनेमात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली रिलीज झाला होता. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. त्यानंतर मणिरत्नम यांनी त्या दोघांना पुन्हा 'रावण' सिनेमात कास्ट केले होते. आता पुन्हा दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.