Join us

अभिषेक बच्चनला कोरोना झाल्यानंतर त्याच्यावर भडकला होता अजय देवगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 18:15 IST

अभिषेक बच्चन आणि अजय देवगण हे एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ते दोघे आता कपिल शर्माच्या द कपिल शर्मा या कार्यक्रमात येऊन धमाल मस्ती करणार आहेत.

ठळक मुद्देद कपिल शर्माचा नवा प्रोमो आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिषेक बच्चन आणि अजय देवगण मजा मस्ती करत कपिलची टर उडवताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये कपिल अभिषेक बच्चनला तू लॉकडाऊनमध्ये काय केले असे विचारताना दिसत आहे.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.आता या कार्यक्रमात अभिषेक बच्चन आणि अजय देवगण हजेरी लावणार आहेत.

 अभिषेक बच्चन आणि अजय देवगण हे एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ते दोघे आता कपिल शर्माच्या द कपिल शर्मा या कार्यक्रमात येऊन धमाल मस्ती करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी कपिल आणि त्याच्या टीमसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. 

द कपिल शर्माचा नवा प्रोमो आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिषेक बच्चन आणि अजय देवगण मजा मस्ती करत कपिलची टर उडवताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये कपिल अभिषेक बच्चनला तू लॉकडाऊनमध्ये काय केले असे विचारताना दिसत आहे. यावर अभिषेक उत्तर देत आहे की, मी कोरोना... हे त्याचे उत्तर ऐकून उपस्थित असलेले सगळेच खळखळून हसत आहेत. त्यावर कपिल अभिषेकला विचारतो की, तुला कोरोना कसा झाला, त्यावर तो एक मजेदार उत्तर देताना दिसत आहे.

अभिनय करत अभिषेक सांगतो की, मला अजय देवगणचा फोन आला आणि मला कोरोना झाले त्यामुळे तो मला खूप ओरडला. त्याचे हे सगळे ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले की, अजय मला चार-पाच दिवसांपूर्वी भेटला होता. मला कोरोना झाले याचे खापर मी अजयवर फोडू नये यासाठी त्याने असे केले होते. अभिषेकने सांगितलेला हा किस्सा ऐकताच उपस्थितांन हसू कोसळले. 

टॅग्स :अभिषेक बच्चनअजय देवगणद कपिल शर्मा शो