अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ते दोघेही तब्बल आठ वर्षानंतर गुलाबजामुन सिनेमात दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला देखील सुरूवात केली आहे. या निमित्ताने नुकतीच एका वाहिनीला अभिषेकने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल आपले मत मांडले.
अभिषेक बच्चनने मानधनाबद्दल सांगताना तो मानधनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, महिला अभिनेत्रींना अभिनेत्याच्या तुलनेत कमी मानधन मिळते. यावरून अनेकदा वाद होतात. पण मी याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. मी आणि ऐश्वर्याने नऊ चित्रपटात काम केले. त्यापैकी आठ चित्रपटात माझ्यापेक्षाही अधिक मानधन हे ऐश्वर्याला मिळाले होते. पिकूमध्ये सर्वाधिक मानधन मिळालेली व्यक्ती दीपिका पादुकोन होती. बॉलिवूडमध्ये कलाकार किती यशस्वी आहे यावरुन त्याचे मानधन ठरते. जर नवोदीत कलाकार शाहरुखइतकेच मानधन मागत असेल तर त्याला ते कसे मिळणार?.ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी अनुराग बसुच्या गुलाबजामुन चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार असून त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघांचे चाहते त्यांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.