Join us

‘सेंटर स्टेज’वरून ‘साईड रोल’वर आला अभिषेक बच्चन! म्हणाला, ही इंडस्ट्री आहेच वाईट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 16:34 IST

अभिषेक बच्चनने  सुमारे दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’मधून वापसी केली होती. या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. निश्चितपणे या कौतुकाने अभिषेकला एक नवी ऊर्जा दिली. पण या चित्रपटाचा अभिषेकच्या करिअरला मात्र फार काही उपयोग झाला नाही.

अभिषेक बच्चनने  सुमारे दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’मधून वापसी केली होती. या चित्रपटात अभिषेकशिवाय विकी कौशल आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. निश्चितपणे या कौतुकाने अभिषेकला एक नवी ऊर्जा दिली. पण या चित्रपटाचा अभिषेकच्या करिअरला मात्र फार काही उपयोग झाला नाही. एकतर या चित्रपटात अभिषेकला दुय्यम भूमिका साकारावी लागली. दुसरे म्हणजे, या चित्रपटानंतर अभिषेकच्या करिअरच्या गाडीनेही फार काही वेग घेतला नाही. आता अभिषेकने या सगळ्यांबद्दलचे दु:ख बोलून दाखवले आहे.

होय, करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये अलीकडे अभिषेकने बहीण श्वेता बच्चनसोबत हजेरी लावली. यावेळी अभिषेक आपल्या करिअरवरही बोलला.  अन्य कुणाला सेंटर स्टेज मिळतय आणि तुम्हाला साईड रोल दिला जातोय हे कुण्याही कलाकारासाठी वाईट वाटण्यासारखीख गोष्ट आहे. मुळात ही इंडस्ट्रीचं खूप वाईट आहे. इथे सगळे काही कमवावे लागते. सेंटरवरून साईडवर आल्यावर वेदना तर होणारचं. येथे वेदनादायी गोष्टीचं अधिक वाट्याला येतात. पण या वेदनाचं शक्तीत परिवर्तीत करणे जमायला हवे, असे अभिषेक यावेळी म्हणाला.

सध्या अभिषेक ‘लाईफ इन अ मेट्रो’च्या सीक्वलमध्ये बिझी आहे.  याशिवाय ‘हाऊसफुल 4’मध्येही तो दिसणार आहे. अभिषेकने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही हिट चित्रपट दिले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या करियरचा ग्राफ चांगलाच ढासळला होता.

  ‘हाऊसफुल 3’ नंतर अभिषेक कुठेही दिसला नाही. या चित्रपटानंतर काहीदिवस ब्रेकवर असल्याचे त्याने सांगितले होते. पण हा ब्रेक संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. मध्यंतरी अभिषेकने चार सिनेमे साईन केल्याचीही चर्चा होती. पण ही चचार्ही निव्वळ चर्चा ठरली होती. यादरम्यान   अभिषेकचा करिअर ग्राफ उंचावण्यासाठी ऐश्वर्याने  सलमानची एक्स मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची निवड केली असल्याची चर्चा होती.   

टॅग्स :अभिषेक बच्चनकॉफी विथ करण 6करण जोहर