Join us

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक-ऐश्वर्याने पोस्ट केला रोमाँटिक फोटो; चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 5:50 PM

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या रायने एक रोमाँटिक फोटो शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमधले पॉवर कपल असलेल्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगली आहे. काही सर्वाजनिक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्यासोबत अभिषेक कुठेच दिसला नसल्याने या चर्चांना उधाण आलं होतं. घटस्फोटाच्या अफवांदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या रायने  एक खास फोटो शेअर केला आहे.  हा फोटो पोस्ट करत दोघांनी घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. या फोटोचं निमित्त म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाचा वाढदिवस. दोघांच्या लग्नाला 16 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त त्यांनी एकमेकांसोबतचा सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

दोघांच्या या फोटोवर  बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसह चाहत्यांनी ही लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेता रितेश देशमुख,  फरदीन खान, ईशा गुप्ता, तनिषा मुखर्जी आणि आथिया शेट्टीने यावर कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

ऐश्वर्या व अभिषेक बच्चन या दोघांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. यानंतर ‘बंटी और बबली’या चित्रपटातील ‘कजरा रे’ या गाण्याचे शूटींग सुरु  असतानाच दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलला. लगेच दोघे  उमराव जानमध्ये दिसले. या चित्रपटाच्या सेटवरच ऐश्वर्या व अभिषेक एकमेकांच्या जवळ आलेत. ‘गुरू’च्या सेटवर मात्र दोघांचे प्रेम चांगलेच बहरले.  ‘गुरू’च्या प्रीमिअरदरम्यान न्यूयॉर्कमधील हॉटेलात बाल्कनीत अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं.

फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोजअभिषेकने ऐश्वर्याला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. ऐश्वर्यानेयाबद्दल सांगितले होते. अभिषेक खरा आहे. आमचे नाते जितके खरे आहे, तितकेच अभिषेकही सच्चा आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. परस्परांची काळजी घेतो, असे ती म्हणाली होती. 2007 मध्ये ऐश व अभिचा साखरपुडा झाला आणि याचवर्षी 20 एप्रिलला दोघे लग्नबंधनात अडकले. 

टॅग्स :अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन