Join us

ओ स्त्री कल आना...! अभिषेक बॅनर्जीने दिलं Stree 2 बाबत अपडेट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 14:51 IST

'स्त्री 2'ची घोषणा झाली तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

हिंदी सिनेमातील सर्वात एंटरटेनिंग हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री' (Stree) च्या सीक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या अभिनयाने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. सध्या 'स्त्री 2'चं  (Stree 2) शूटिंग सुरु आहे. सिनेमात आणखी एका अभिनेत्याने लक्ष वेधून घेतलं होतं तो म्हणजे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee). त्याने नुकतीच 'स्त्री 2' बाबत नवीन अपडेट दिली आहे.

'स्त्री 2'ची घोषणा झाली तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. दरम्यान अभिनेता अभिषेक बॅनर्जीने सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. तो म्हणाला, "सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु आहे. व्हीएफएक्ससाठी बराच वेळ लागत आहे. दिग्दर्शक अमर कौशिक हे त्यांच्या कामात अगदी परफेक्ट असतात. ते जोवर समाधानी होत नाहीत तोवर सिनेमाचं काही ना काही काम सुरुच राहतं."

'स्त्री 2'मध्ये पहिल्या भागापेक्षाही जास्त मजा येणार आहे. अभिषेक पुढे म्हणाला, "आम्ही सर्वांनीच शूटिंगवेळी खूप मजामस्ती केली. श्रद्धा, राजकुमार पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती आम्ही सगळेच पुन्हा एकत्र आलो तेव्हा धमाल आली. प्रेक्षकांसारखंच आम्हीही स्त्री 2 च्या रिलीजची वाट पाहत आहोत."

'स्त्री' सिनेमा 2018 साली रिलीज झाला होता. या सिनेमाने बक्कळ कमाई करत बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. एका गावात भूताची दहशत असते. ती भूत गावातील पुरुषांना उचलून नेते. म्हणूनच गावात 'ओ स्त्री कल आना' असं लिहिलेलं असतं. मजेशीर अशी ही कहाणी दाखवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात याचा  सीक्वेल येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरराजकुमार रावबॉलिवूडसिनेमा