Join us

​रात्रभर झोपला नाही अभिषेक; घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2016 3:51 PM

ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चनचे पत्नी ऐश्वर्या व मुलगी आराध्या वरचे पे्रम लपून राहिलेले नाही. आराध्यासाठी तर तो कुणाशीही पंगा घेण्यास अगदी तयार असतो. अशावेळी ऐश्वर्या व आराध्यासोबत विमानतळावर झालेले गैरवर्तन अभिषेक कसे बसे खपवून घेणार!

ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चनचे पत्नी ऐश्वर्या व मुलगी आराध्या वरचे पे्रम लपून राहिलेले नाही. आराध्यासाठी तर तो कुणाशीही पंगा घेण्यास अगदी तयार असतो. अशावेळी ऐश्वर्या व आराध्यासोबत विमानतळावर झालेले गैरवर्तन अभिषेक कसे बसे खपवून घेणार! अलीकडे ऐश्वर्या, आराध्या या दोघी मायलेकी लंडनवरून परतल्या. यावेळी ऐश्वर्याची आई वृंदा रॉय यासुद्धा त्यांच्यासोबत होत्या.  मुंबई विमानतळावर ऐश्वर्याच्या बाईटसाठी मीडिया अक्षरश: तुटून पडला. यामुळे आराध्या प्रचंड घाबरली. सुरक्षा कर्मचाºयांनी ऐश्वर्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता गोष्ट आणखीच बिघडली. या गडबडीत एक कॅमेरामॅन वृंदांना येऊन धडकला आणि यात वृंदा खाली पडल्या. अभिषेकला ही गोष्ट कळली तेव्हा आराध्याच्या काळजीने तो रात्रभर झोपू शकला नाही. आता प्रत्येकवेळी अभिषेक ऐश्वर्यासोबत जाऊ शकणार नाहीच. त्यामुळे त्याने सुरक्षा कर्मचाºयांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्यासोबत सध्या पाच सुरक्षारक्षक असतात. पण अभिषेकला ही संख्या कमी वाटतेय. त्यामुळे मुलीच्या व पत्नीच्या सुरक्षेसाठी त्याने गार्डची संख्या आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.