Join us  

आलिया अन् बॉबी देओलमध्ये जुंपली! 'अल्फा' च्या सेटवर जबरदस्त ॲक्शन सीन, १०० सुरक्षारक्षक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 4:29 PM

यशराज फिल्म्सचा हा स्पाय युनिव्हर्स अंतर्गत सिनेमा आहे ज्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे.

यशराज फिल्म्सचा बहुप्रतिक्षित 'अल्फा' सिनेमाच्या शूटला सुरुवात झाली आहे. आलिया भट आणि शर्वरी वाघ या दोन्ही अभिनेत्री जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहेत. यशराज फिल्म्सचा हा स्पाय युनिव्हर्स अंतर्गत सिनेमा आहे ज्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या सिनेमासंबंधी लेटेस्ट अपेडट समोर आलं आहे. आलिया भट आणि बॉबी देओल यांच्यात जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स शूट सुरु आहे.

आयएएनएस रिपोर्टनुसार, आलिया भट आणि बॉबी देओल मुंबईतील फिल्म सिटीमध्ये अॅक्शन सीन शूट करत आहेत. हा सिनेमातला अतिशय महत्वाचा सीन असल्याने सेटबाहेर तब्बल 100 बॉडीगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. कोणीही या सेटवर प्रवेश घेऊ शकत नाही. जेणेकरुन सेटवरुन एकही फोटो, व्हिडिओ लीक होऊ नये. फिल्मसिटीजळ तगडी सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सूत्रांनुसार, हा सिनेमातला सर्वात दमदार आणि क्रूर अॅक्शन सीन असणार आहे. आलिया आणि बॉबीमध्ये धमाकेदार फाईट असून रक्तपातही दाखवण्यात येणार आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीलाच स्पाय युनिव्हर्सच्या 'अल्फा' सिनेमाची घोषणा झाली. आलियाने इन्स्टाग्रामवर अल्फाच्या टायटल अनाऊंसमेंटचा व्हिडिओही शेअर केला. व्हिडिओ क्लिपमध्ये आलियाचा आवाज ऐकू येतो ज्यात ती म्हणते,"ग्रीक अल्फाबेटचं पहिलं अक्षर आणि आपल्या प्रोग्रॅमचा मोटो. सगळ्यात आधी, सगळ्यात वेगवान, सगळ्यात वीर, नीट बघितलं तर शहरात सगळीकडे जंगल आहे आणि प्रत्येक जंगलात राज्य करेल एक अल्फा."

यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफने याआधीच एन्ट्री घेतली आहे. कतरिनाने यशराजच्या 'एक था टायगर' मध्ये झोयाची भूमिका साकारली. तर दीपिकाने गेल्या वर्षी 'पठाण' मध्ये काम केले. कियारा अडवाणीही या स्पाय युनिव्हर्सचा भाग होणार आहे. ती हृतिक आणि ज्युनिअर एनटीआरसोबत 'वॉर 2' मध्ये झळकणार आहे.

टॅग्स :आलिया भटबॉबी देओलबॉलिवूडसिनेमा