Join us

Breaking : अभिषेक बच्चनचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; चाहत्यांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 14:41 IST

बच्चन कुटुंबीयातील चारही सदस्य झाले कोरोना पॉझिटिव्ह...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यानं ट्विट करून ही माहिती दिली. बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. ऐश्वर्या आणि आराध्य यांनी सर्वप्रथम कोरोनावर मात केली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि ते घरी परतले. आज अभिषेकचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला. 

निंदनीय: 90 वर्षीय आईला कोरोना झाला म्हणून मुलानं तिला जंगलात सोडलं! 

11 जुलैच्या रात्री अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना लगेचच नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. देशभरातील चाहत्यांसाठी हा धक्काच होता. सगळ्यांनीच सोशल मीडियावरून त्यांना ‘गेट वेल सून’च्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर अभिषेक बच्चनचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता.  ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही कोरोनाचं निदान झालं. त्यामुळे अमिताभ अधिकच हळवे झाले होते. मात्र, बिग बींनी जिद्दीनं कोरोनाला हरवलं आणि 2 ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या बातमीनं सगळेच चाहते सुखावले.

अभिषेकनं ट्विट केलं की,''वचन हे वचन असतं!, आज दुपारी माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी कोरोनावर मात केली. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे हे शक्य झाले. नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व नर्स यांचे आभार.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं!

सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट

जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये

शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स  

बोंबला! डुक्करामुळे तो विवस्त्र धावत सुटला, जाणून घ्या व्हायरल फोटोची गंमत...

दहा वर्षांच्या प्रेमानंतर अखेर टीम इंडियाचा क्रिकेटपटू चढला बोहोल्यावर!

टॅग्स :अभिषेक बच्चनबॉलिवूड