अदा शर्माचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बस्तर' सिनेमा आज रिलीज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून अदाच्या या सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर हा सिनेमा आज रिलीज झालाय. हा सिनेमा पाहून सर्वच स्तरांमधून विविध प्रतिक्रिया आहेत. अशातच मराठमोळे अभिनेते अजय पूरकर यांनी 'बस्तर' पाहून त्यांचं रोखठोक मत सोशल मीडियावर शेअर केलंय.
अजय पूरकर यांनी व्हिडीओ पोस्ट करुन सांगितलं की, "काल बस्तर द नक्सल स्टोरी नावाचा झंझावात बघितला. अदा शर्मा, इंदिरा तिवारी या मुलींनी जबरदस्त काम केलंय. सुदिप्तो सेन यांनी पुन्हा एकदा कमाल केलीय. संपूर्ण भारतीयांनी हा चित्रपट बघा. आणि तुम्हीच नका बघू, तुमच्या मुलांनाही दाखवा. देशात आतनं जी कीड लागलीय, जी वाळवी देश पोखरत आहे, सगळ्या लोकांचा पर्दाफाश केलाय या सिनेमातून.."
अजय पूरकर पुढे म्हणतात, "त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या शाळा-कॉलेजमध्ये जी लोकं आहेत.. आपण काम करतो त्या इंंडस्ट्रीत अशी लोकं आहेत या सगळ्यापांसून सावध राहा. तुमच्या मुलांंनाही सावध राहायला सांगा. हा देश संपवतील ही लोकं. या लोकांना 'बस्तर - द नक्सल स्टोरी' सिनेमाने सणसणीत कानफडात मारली आहे." असं परखड मत व्यक्त करुन अजय पूरकर यांनी 'बस्तर' सिनेमा पाहण्याचं आवाहन सर्वांना केलाय.